जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / गोळी लागल्यामुळे बर्थडे बॉयचा मृत्यू; आमदाराच्या घरातील पार्टीमध्ये घडला धक्कादायक प्रकार

गोळी लागल्यामुळे बर्थडे बॉयचा मृत्यू; आमदाराच्या घरातील पार्टीमध्ये घडला धक्कादायक प्रकार

गोळी लागल्यामुळे बर्थडे बॉयचा मृत्यू; आमदाराच्या घरातील पार्टीमध्ये घडला धक्कादायक प्रकार

राकेश याचा वाढदिवस होता. पार्टीदरम्यान सर्व मित्र मिळून बिअर प्यायले आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 21 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान (Birthday Party) झालेल्या गोळीबारात बर्थडे बॉयचा मृत्यू झाला. ही पार्टी समाजवादी (SP) पार्टीचे एमएलसी (MLA) अनिल यादव यांच्या फ्लॅटमध्ये सुरू होती. सांगितले जात आहे की, पार्टीदरम्यान पिस्तुलातून अचानक गोळी चालवण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी मृत तरुणाच्या चार मित्रांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. लखनऊच्या लाप्लास कॉलनीमध्ये समाजवादी पार्टीचे एमएलसी अनिल यादव फ्लॅट क्रमांक 201 मध्ये हा प्रकार घडला आहे. सांगितले जात आहे की, राकेश आणि त्याचे चार मित्र बर्थडे पार्टीसाठी आले होते. डीसीपी सेंट्रल झोन सोमेन वर्मा यांनी सांगितलं की, राकेश याचा वाढदिवस होता. पार्टीदरम्यान सर्व मित्र मिळून बिअर प्यायले. यानंतर ते एकमेकांसोबत पिस्तुल पाहत होतो. या दरम्यान गोळी झाडली गेली आणि जी राकेशला लागली व यातच त्याचा मृत्यू झाला. गोळी लागल्यामुळे राकेश याचा मृत्यू झाला आहे. हे ही वाचा- सुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला. यामध्ये एका पिस्तुलासह दोन मॅग्जिस मिळाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, राकेश लखनऊचा राहणारा होता. ज्या पिस्तुलातून गोळी चालविण्यात आली, त्याचा परवाना नाही. ही पिस्तुल पंकज याची असल्याचे सांगितले जाते. जेव्हा गोळी चालवण्यात आली तेव्हा पिस्तुल विनयजवळ होती. पंकज सपा एमएलसी फ्लॅटचे केअर टेकर म्हणून राहतो. पोलिसांनी मृताच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार कारवाई सुरू केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. पिस्तुलातून सुटलेल्या गोळीमुळे राकेश याचा मृत्यू झाला की यामागे काही घातपात होता, या दिशेनेही तपास करण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात