Home /News /crime /

सुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार

सुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार

काही दिवसांपूर्वीच जवान सुट्टीवर घरी आला होता, त्यातच हा धक्कादायक प्रकार घडला

    गुरुदासपूर, 20 नोव्हेंबर : पंजाबमधील (Punjab) गुरुदासपुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुट्ट्यांसाठी घरी आलेल्या एका BSF जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हत्या करणारे इतर कोणी नसून त्याच्या कुटुंबातील आहेत. सांगितले जात आहे की, जवानाचं मावशीच्या मुलीवर प्रेम होतं. जेव्हा याबाबत मुलीच्या घरातील मंडळींना कळालं तर त्यांनी जवानावर हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केली आहे. गुरुदासपूरमधील पोलीस ठाणे तिब्बड हद्दीतील मान चौपडा गावात राहणारा शरणजीत कुमार बीएसएफमध्ये तैनात होता. सांगितलं जात आहे की, तो काही दिवसांपूर्वी घरी आला होता. मृत जवानाचा भाऊ अर्शदीप यांनी सांगितलं की, रात्री जेव्हा तो घरी होता, तेव्हा त्याच्या मावशीचा मुलगा, त्याच्या काकासोबत आला. ते दोघे शरणजीत कुमार यांना जवळील हवेलीत घेऊन गेले. हे ही वाचा-अजबच आहे! मालकाकडून चावी मागून करायचा बाईक चोरी; चौकशीदरम्यान पोलिसही झाले हैराण यादरम्यान दोघांमध्ये मुलीबाबत वाद झाला. यानंतर त्या दोघांनी शरणजीतवर धारदार शस्त्राने हल्ला केला. शरणजीतला कोणी वाचविण्यासाठी पोहोचत, त्यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली आहे. जवानाची हत्या करून ते दोघे फरार झाले. शरणजीत यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसएचओ कुलवंत सिंह यांनी सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवानाचं त्याच्या मावशीच्या मुलीवर प्रेम होतं. त्यातून मुलीच्या घरातल्यांनी जवानाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या