जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! 2 वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी घरातील पायऱ्यांखाली जिवंत सापडली, काय आहे प्रकरण?

धक्कादायक! 2 वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी घरातील पायऱ्यांखाली जिवंत सापडली, काय आहे प्रकरण?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

ही मुलगी 2019 साली बेपत्ता झाली होती. नुकतंच ती पोलिसांना तिच्याच घरात पायऱ्यांच्या खाली बनवलेल्या खास चेंबरमध्ये सापडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : पोलीस दोन वर्षांपासून ज्या मुलीचा शोध घेत होते, ती आपल्याच घरातील पायऱ्यांखाली असलेल्या सिक्रेट रूममध्ये आढळून आली. असं सांगितलं जात आहे की कस्टडी न मिळाल्याने आई-वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं (Parents Kidnapped their Daughter) आणि तिला घरातच लपवून ठेवण्यात 2 वर्ष यशस्वी ठरले. या मुलीचं वय आता 6 वर्ष झालं आहे (Little Girl Found Under Staircase). निर्जनस्थळी कारमध्ये स्फोट,जोडप्याचे निर्वस्त्र अवस्थेत आढळले जळालेले मृतदेह ही मुलगी 2019 साली बेपत्ता झाली होती. नुकतंच ती पोलिसांना न्यूयॉर्कच्या हडसन येथील आपल्या घरात पायऱ्यांच्या खाली बनवलेल्या खास चेंबरमध्ये सापडली. या मुलीची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या बायोलॉजिकल पालकांनीच तिचं अपहरण केलं होतं. न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितलं की घरातील पायऱ्यांच्या खाली बनवलेल्या चेंबरमधून सहा वर्षाची पॅसली शुल्टिस हिला बाहेर काढण्यात आलं. मुलगी अगदी व्यवस्थित आहे. सांगितलं जात आहे, की पॅसलीचं बायोलॉजिकल पालक किम्बर्ले कूपर आणि किर्क शुल्टिस यांनीच अपहरण केलं होतं. या दोघांकडे मुलीला आपल्याजवळ ठेवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. 2019 साली मुलीची कस्टडी त्यांना मिळाली नाही आणि यानंतरच पॅसली गायब झाली होती. पोलिसांचं म्हणणं आहे की अपहरणानंतर पॅसलीला घरातील गुप्त खोलीत ठेवलं गेलं होतं, ही खोली अतिशय लहान आणि थंड होती.

अशीच शिक्षा हवी! चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा

पोलिसांनी सांगितलं की सोमवारी त्यांना मुलीबद्दल काहीतरी माहिती मिळाली. घरात तपासणी सुरू केली असता त्यांनी पायऱ्यांवर लावण्यात आलेलं लाकूड हटवलं असता मुलीचे पाय दिसले. यानंतर मुलीला तिथून बाहेर काढण्यात आलं. मात्र मुलीच्या आईचं म्हणणं आहे की तिने २०१९ पासून मुलीला पाहिलंच नाही. तिला असं वाटत होतं की कूपर तिला घेऊन पेन्सिल्वेनियामध्ये पळून गेला आहे. पोलिसांनी मुलीचे आई-वडील आणि आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल केला असून मुलीला तिच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात