Home /News /crime /

मुलाचा मृतदेह पाहून आईनेही सोडले प्राण, जमावाच्या मारहाणीत झाला होता 'या' पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

मुलाचा मृतदेह पाहून आईनेही सोडले प्राण, जमावाच्या मारहाणीत झाला होता 'या' पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

बिहारमधील किशनगंज ठाणेदार अश्विनी कुमार ((Ashwini Kumar) यांना जमावानं ठार मारल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघड झाली होती. (Kishanganj inspector mob lynching). अश्विनी कुमार यांच्या आईनं मुलाचा मृतदेह पाहून प्राण सोडला आहे.

    किशनगंज (बिहार), 11 एप्रिल : बिहारमधील किशनगंज ठाणेदार अश्विनी कुमार (Ashwini Kumar) यांना जमावानं ठार मारल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघड झाली होती. (Kishanganj inspector mob lynching) या संतापजनक घटनेनंतर अश्विनी कुमार यांच्या घरात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. मुलाचा मृतदेह पाहताच बसलेल्या धक्क्यामुळे त्यांच्या आईचा देखील मृत्यू झाला आहे. अश्विनी कुमार यांच्या आई मुलाचा मृतदेह पाहू शकल्या नाहीत. त्यांनी अत्यंत शोकाकुल अवस्थेत प्राण सोडले. या घटनेनंतर त्या संपूर्ण परिसरातील वातावरण आणखीनच अस्वस्थ झाले. अश्विनी कुमार आणि त्यांच्या आईवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अश्विनी कुमार यांच्या हत्येनंतर त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ही हत्या म्हणजे एक कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अश्विनी कुमार यांच्यासोबत गेलेल्या पोलिसांपैकी एकानं जरी गोळी चालवली असती तर जमावाच्या तावडीतून ते वाचले असते, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. आरोपी माय -लेकरांना अटक दरम्यान, अश्विनी कुमार यांच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिरोज आलम, त्याचा भाऊ आबूजार आलम आणि आई सहीनूर खातून असं या आरोपींची नावं आहेत. फिरोज हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बंगालमध्ये झाली हत्या मृत अश्विनी बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार होते. एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून अश्विनी कुमार यांची  हत्या केली. पश्चिम बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील पांजीपाडा पोलीस हद्दीतील पनतापाडा गावात छापेमारी सुरू केली होती. अपराध्यांना वाचवण्यासाठी गावातील जमावानं पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. LIVE VIDEO: भररस्त्यात पत्नीला चाकूनं भोसकलं, 45 पेक्षाही जास्त वार करत हत्या या प्रकरणी आता मंडळ निरीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.घटनेच्यावेळी संबंधित मृत पोलीस अधिकारी अश्विनी कुमार  यांना एकटं सोडून पळ काढल्यारप्रकरणी इतरांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Attack on police, Bihar, Crime news

    पुढील बातम्या