बिहार, 24 सप्टेंबर : मिठाई (sweets) आणि मोबाइल ( mobile phone) चोरल्याप्रकरणी (theft) एका अल्पवयीन मुलाची किशोर न्याय परिषदेच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. अवघ्या 15 दिवसांत या प्रकरणावर सुनावणी करून न्यायदंडाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. जर लोणीचोरी ही बाललीला असेल तर मिठाईचोरी हा गुन्हा कसा? असा सवाल निकाल देताना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी (Chief Justice) बिहार (Bihar) मधील आरा जिल्ह्याच्या (Ara district) जिल्हा बाल संरक्षण युनिट (District Child Protection Unit) ला विचारला. तसंच न्यायालयाने या मुलाची योग्य काळजी घेण्याचे निर्देशही त्यांना दिले.
आरोपी अल्पवयीन मुलगा हा आरा जिल्ह्यातील एका गावचा रहिवासी आहे. घटनेवेळी हा मुलगा त्याच्या आजोळी हरनौत जिल्ह्यातील एका गावी गेला होता. येथे मिठाई आणि मोबाइल चोरीचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. गुरुवारी किशोर न्याय परिषदेचे मुख्य न्यायदंडाधिकारी मानवेंद्र मिश्रा यांच्या कोर्टात या प्रकरणावरील सुनावणी झाली. सुनावणीवेळी हा मुलगा खूप घाबरला होता. तो खूप रडायला लागला आणि त्याने आपल्या कुटुंबाची हालाखीची परिस्थिती सांगितली.
सुनावणीवेळी, जर लोणीचोरी बाल लीला असेल तर मिठाई चोरीचा गुन्हा कसा? असा प्रश्न न्यायदंडाधिकारी मानवेंद्र मिश्रा यांनी गुन्हा नोंदवणाऱ्या चेरो ओपीने पोलीस स्टेशन प्रमुखांना विचारला. लहान गुन्ह्यांत अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर नोंदवणं टाळा अशी समजही मिश्रा यांनी पोलिसांना दिली. अल्पवयीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा असंही ते म्हणाले. अल्पवयीन मुलाविरूद्ध खटला दाखल करणाऱ्या महिलेला मुलांप्रती सहनशील राहण्याचा सल्ला देऊन न्यायाधीश म्हणाले की, ‘जर तुमच्याच मुलाने मिठाई, पैसे, मोबाईल चोरला असता तर त्यालाही तुम्ही पोलिसांच्या हवाली केलं असतं का?’
हे ही वाचा-
न्यायाधीशांसमोर गँगवॉर, Delhi कोर्टातील Shootout चा Live Video
अल्पवयीन मुलाचे वकील कांचन कुमार यांनी म्हटलं की, मुलाचे वडील दीर्घ काळापासून एका आजाराने ग्रस्त आहेत. तर आई मानसिकरित्या विकृत आहे. कुटुंबात उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही. घटनेच्या वेळी तो आपल्या मामाच्या घरी होता. मामा आणि आजी यांचंही निधन झालं आहे. तो खूप भुकेला होता आणि शेजारच्या मावशीच्या घरी गेला. भूक भागवण्यासाठी त्याने फ्रिजमध्ये ठेवलेली मिठाई खाल्ली आणि फ्रीजवर ठेवलेल्या मोबाइल फोनवर गेम खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तक्रारदार महिलेने हे प्रकरण अतिरंजितपणे सर्वांना सांगितलं आणि त्या लहान मुलाला पोलिसांकडे सोपवलं.
सुनावणीवेळी न्यायाधीश मानवेंद्र मिश्रा म्हणाले की, की भारतीय सनातन संस्कृतीत लोणी चोरणं आणि हंडी फोडणं या गोष्टी श्री कृष्णाच्या बाल लीला सांगितल्या गेल्या आहेत. पण आज अल्पवयीन मुलाला भुकेमुळे मिठाई चोरण्याचा गुन्हा मानला जातोय. न्यायाधीशांनी अवघ्या 15 दिवसांत या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण करून मुलाची निर्दोष मुक्तता केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.