बिहार, 16 सप्टेंबर : जर अचानक तुमच्या खात्यात साडे पाच लाख रुपये आले तर तुमची काय अवस्था होईल? अर्थात तुम्हाला धक्का बसेल. मात्र तुम्ही तातडीने याबाबत बँकेला कळवाल. मात्र बिहारमधील (Bihar News) खगडिया भागातील एका व्यक्तीने मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली. या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये साडे पाच लाख रुपये जमा (Five and a half lakh rupees were deposited in the account) झाले. यानंतर मात्र तरुणाने ऐश करीत पैसे खर्च केले. चुकीने पैसे झाले होते ट्रान्सफर या प्रकरणात जबरदस्त ट्विट तेव्हा आला ज्यावेळी याचा खुसाला झाला. बँकेने नोटीस पाठवीत रंजीत दास नावाच्या व्यक्तीकडून पैसे मागितले. यावर रंजीत दासने पैसे परत करण्यास नकार दिला. इतकच नाही तर त्याने वर बँकेलाच प्रश्न केला. आम्ही पैसे का परत करू, हे पैसे तर पंतप्रधानांनी पाठवले आहे, असं म्हणत त्याने पैसे देण्यास नकार दिला. तरुण पैसे देत नसल्याने बँकने पोलिसात तक्रार केली. आता रंजीत दास याला अटक करण्यात आली आहे. ( 5 lakh suddenly came in the account Spent money in Modis name Now sent to jail ) हे ही वाचा- बापरे! तरुणाने सासरच्या मंडळींसमोर स्वत:ला पेटवून घेतलं; घटनेचा भयावह VIDEO तरुणाचा पैसे देण्यास नकार, म्हणाला… खगडिया ग्रामीण बँकेकडून चुकून रंजीत दास याच्या खात्यात साडे पाच लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. ज्यानंतर त्यांना चुकीची जाणीव झाली. यानंतर त्यांनी अनेकदा रंजीत दास याला नोटीस पाठवल्या. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. सर्व पैसे खर्च केल्याचं सांगून त्याने पैसे दिले नाही. पैशांबाबत काय म्हणाला तरुण.. रंजीत दास म्हणाला की, जेव्हा मला या वर्षी मार्चमध्ये पैसे मिळाले तेव्हा मला खूप आनंद झाला. मला वाटलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या बँकेत 15 लाख रुपये ट्रान्सफर करण्याचं वचन दिलं होतं, ही रक्कम त्यातील पहिला भाग असावा. म्हणून मी सर्व पैसे खर्च केले. आता माझ्या बँक खात्यात पैसे नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, बँक मॅनेजरच्या तक्रारीनंतर आम्ही रंजीत दास याला अटक केली आहे. अद्याप पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.