मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गोड गोड बोलून गुजराती तरूणीनं केला फ्रॉड, तब्बल 250 अमेरिकन लोकांना अडकवलं जाळ्यात

गोड गोड बोलून गुजराती तरूणीनं केला फ्रॉड, तब्बल 250 अमेरिकन लोकांना अडकवलं जाळ्यात

कर्ज देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला मध्यप्रदेशच्या ग्वालियर गुन्हे शाखेने (Gwalior Crime Branch) पकडले आहे. पोलिसांनी बहोडापूरच्या आनंद नगर येथून बनावट कॉल सेंटर (Fake Call Centre) चालवणाऱ्या 22 वर्षीय मुलीसह 7 जणांना अटक केली आहे.

कर्ज देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला मध्यप्रदेशच्या ग्वालियर गुन्हे शाखेने (Gwalior Crime Branch) पकडले आहे. पोलिसांनी बहोडापूरच्या आनंद नगर येथून बनावट कॉल सेंटर (Fake Call Centre) चालवणाऱ्या 22 वर्षीय मुलीसह 7 जणांना अटक केली आहे.

कर्ज देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला मध्यप्रदेशच्या ग्वालियर गुन्हे शाखेने (Gwalior Crime Branch) पकडले आहे. पोलिसांनी बहोडापूरच्या आनंद नगर येथून बनावट कॉल सेंटर (Fake Call Centre) चालवणाऱ्या 22 वर्षीय मुलीसह 7 जणांना अटक केली आहे.

पुढे वाचा ...

ग्वालियर, 11 एप्रिल:  कर्ज देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला मध्यप्रदेशच्या ग्वालियर गुन्हे शाखेने (Gwalior Crime Branch) पकडले आहे. पोलिसांनी बहोडापूरच्या आनंद नगर येथून बनावट कॉल सेंटर (Fake Call Centre) चालवणाऱ्या 22 वर्षीय मुलीसह 7 जणांना अटक केली आहे. या टोळीमधील सर्वात महत्त्वाची सदस्य मोनिका ZOOM अॅपच्या माध्यमातून अमेरिकेतील लोकांना व्हिडिओ कॉल करायची. यानंतर लोक तिच्या नादात अनेक पैसै लुटवून देत होते.

माहितीनुसार, मोनिका स्वत:ला लँडिंग क्लब अमेरिकन कंपनीची एजंट असल्याचे सांगायची. यानंतर कर्ज देण्याबाबत सांगायची. कर्जात मोठी रक्कम दिल्यानंतर ती तिचे कमिशन आंतरराष्ट्रीय गिफ्ट व्हाउचरच्या रूपात घेत असे. टोळीचा मास्टर माईंड खरेदीसाठी व्हाउचर कॅश करून घेत असे. या बनावट कॉल सेंटरमधून गुन्हे शाखेला डझनहून अधिक लॅपटॉप, मोबाईल आणि इतर वस्तू मिळाल्या आहेत. टोळीच्या सदस्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी आतापर्यंत 250 हून अधिक अमेरिकन लोकांना फसवले आहे.

गुन्हे शाखेने बहोडापूर येथील आनंद नगरमधील एका घरात छापा टाकला, जिथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवले जात होते. गुन्हे शाखेने येथून 6 मुले तर 1 एका मुलीला अटक केली आहे. तसेच येथून लॅपटॉप, मोबाईल, रजिस्टर आणि अन्य सामान जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, खुलासा झाला की, हे एक बनावट कॉल सेंटर आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे बसलेला या टोळीचा म्होरक्या आपल्या सहकाऱ्यांसोबत हे कॉल सेंटर चालवत होता.

येथून पकडण्यात आलेल्यांमध्ये आशीष कैन, आकाश कुशवाहा, कुनाल सिंह,तरुण कुमार (सर्व रा. आगरा), रोहित शर्मा, सागर आणि मोनिका (सर्व रा. अहमदाबाद) यांचा समावेश आहे. मोनिका गोड-गोड बोलून लोकांना फसवण्याचे काम करायची. सर्वच जण इंग्लिशमध्ये तरबेज आहेत. तसेच त्यांना अमेरिकन भाषेबाबत माहिती होती. यामुळे अमेरिकन ग्राहक सहजरित्या यांच्या जाळ्यात अडकत होते.

हेही वाचा - Non-Veg खाण्यावरुन JNU मध्ये राडा, Video शेअर होताच ABVP नं दिलं स्पष्टीकरण

याप्रकारचे लोकांना जाळ्यात अडकवायचे

काॅल सेंटरचा संचालक या लोकांना परदेशातील लोकांचा मोबाईल नंबर उपलब्ध करुन द्यायचा. यानंंतर टोळीतील सदस्य ZOOM अॅपच्या माध्यमातून परदेशातील लोकांशी संपर्क साधायचे. त्यांना सांगायचे की, ते लँडिंग क्लब अमेरिकेन कंपनीचे एंजट आहेत. याप्रकारे मोनिका व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अमेरिकतील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत होती. याप्रकारे परदेशी लोकसुद्धा त्यांना आपला सुरक्षा क्रमांक तसेच बँकेची माहिती त्यांना देऊन द्यायचे. माहितीची पडताळणी करण्याच्या नावाखाली गुगल प्ले कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस, बेस्ट बाय, ऍपल, बनिला बिजा असे आंतरराष्ट्रीय गिफ्ट व्हाउचर त्यांच्याकडून कमिशन म्हणून घेत. यानंतर या टोळीचा मास्टर माईंड परप्रांतीयांकडून खरेदी करून मिळालेले गिफ्ट व्हाउचर कॅश करत असे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Financial fraud, Gwalior, Online fraud