मराठी बातम्या /बातम्या /देश /JNU मध्ये Non-Veg खाण्यावरुन राडा, Video शेअर करत अध्यक्षांचे गंभीर आरोप; ABVP नं दिलं स्पष्टीकरण

JNU मध्ये Non-Veg खाण्यावरुन राडा, Video शेअर करत अध्यक्षांचे गंभीर आरोप; ABVP नं दिलं स्पष्टीकरण

JNU Controversy: शुक्रवारी रात्री (Jawaharlal Nehru University) जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (JNU) कॅम्पसमध्ये मासांहार अन्नावरुन (नॉन व्हेज) (non-vegetarian food) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला.

JNU Controversy: शुक्रवारी रात्री (Jawaharlal Nehru University) जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (JNU) कॅम्पसमध्ये मासांहार अन्नावरुन (नॉन व्हेज) (non-vegetarian food) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला.

JNU Controversy: शुक्रवारी रात्री (Jawaharlal Nehru University) जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (JNU) कॅम्पसमध्ये मासांहार अन्नावरुन (नॉन व्हेज) (non-vegetarian food) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला.

नवी दिल्ली, 11 एप्रिल: शुक्रवारी रात्री (Jawaharlal Nehru University) जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (JNU) कॅम्पसमध्ये मासांहार अन्नावरुन (नॉन व्हेज) (non-vegetarian food) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला. नवरात्रीचा उपवास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या मेसमध्ये मांसाहार अन्न ठेवण्यावरुन आक्षेप व्यक्त केला होता. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये झालेल्या वादात 6 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी दोन्ही गटातील असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.दरम्यान जेएनयूमधील या वादाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जेएनयू गोंधळाच्या वादावर विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी वक्तव्य जारी करत काही अतिरेक्यांच्या माध्यमातून अपप्रचार केला जात असल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाला जेवण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र काही विद्यार्थी तेथे रामनवमीच्या दिवशी पूजा करत होते. त्यामुळे डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी तेथे आंदोलन केलं. मारहाण केल्याचं समोर आलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी यावर विरोध केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान दोन्ही संघटनांने विद्यार्थी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. तर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष साई बाला यांनी दावा केला आहे की, अभाविपने विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखलं आहे. नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखण्यात आलं होतं, असं साई बाला यांनी म्हटलं.

साई बाला यांनी अभाविपने विद्यार्थ्यांना मेसमध्ये नॉनव्हेज खाण्यापासून रोखल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचवेळी अभाविपकडून या आरोपांचे खंडन करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ जेएनयूच्या कावेरी हॉस्टेलमधील आहे.

एन साई बाला यांनी ट्विट करुन लिहिलं की, ABVP च्या गुंडांनी कावेरी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखलं. जेएनयूचे कुलगुरू या गुंडगिरीचा निषेध करणार का? आता विद्यार्थ्यांच्या जेवणाचा निर्णय होणार का? मेसच्या सेक्रेटरीलाही मारहाण करण्यात आली, या गुंडगिरीविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. भारताच्या विचारसरणीवर हल्ला होत आहे.

अभाविपनं एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात अभाविपनं स्पष्टीकरण दिलं आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त कावेरी हॉस्टेलमध्ये पूजा आणि हवनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पूजेला जेएनयूचे विद्यार्थी आणि मुली मोठ्या संख्येनं जमले होते. त्याचवेळी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन पूजेत अडथळा आणला आणि विरोध करण्यास सुरूवात केली. त्यांनी संपूर्ण प्रकरण राईट टू फूड आणि व्हेज-नॉन-व्हेजभोवती फिरवण्याचा प्रयत्न केला.

First published:

Tags: JNU