meभंडारा, 15 एप्रिल : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहान्याने दोन नराधमाने एका 18 वर्षीय युवतीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्याच्या सिहोरा पोलीस स्टेशन हद्दित घडली आहे. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुसरान खान (रा. बालाघाट) व रोहित भोयर (रा. कोरणी) जिल्हा गोंदिया असे अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण? मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील कुंभली येथील 18 वर्षे तरुणीची ओळख आरोपी मुसरान खान (रा. बालाघाट) व रोहित भोयर (रा. कोरणी जिल्हा गोंदिया) याच्याशी झाली. त्यांनी तिला रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून गोंदिया येथे घेऊन गेले. त्यानंतर परत मुलीला तुमसर तालुक्यातील चुल्हाड गावी घेउन जात आळीपाळीने पाशवी अत्याचार केला. दरम्यान तिथून मुशरान खान निघून गेला व रोहीत भोयर याने मुलीला घेऊन उडीसा राज्यातील रेंगाडी येथे घेऊन गेला. मात्र, मुलगी ही दहा तारखेपासून बेपत्ता असल्याने तिच्या आई-वडिलांनी याची तक्रार बालाघाट पोलिसात दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत उडिसा येथून पीडित मुलीला परत आणले. वाचा - 3 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज, पण लेस्बियन मैत्रिणीने केला कहर, अखेर तिने… पीडितिने सगळी हकीकत आपल्या आई-वडिलांना आणि बालाघाट पोलिसांना दिली आहे. दरम्यान हा घटनाक्रम महाराष्ट्र येथील चुल्हाड मध्ये झाला असल्याने बालाघाट पोलिसांनी सिहोरा पोलिसांना प्रकरण वळते केले. त्या अनुषंगाने सिहोरा पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सिहोरा पोलीस करीत आहे.