जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भंडारा जिल्हा हादरला ! कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

भंडारा जिल्हा हादरला ! कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

भंडारा जिल्हा हादरला ! कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. त्याच दरम्यान भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बारावीच्या विद्यार्थ्याने कॉलेजमधून घरी येताच टोकाचं पाऊल उचललं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 2 फेब्रुवारी: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये सुरू (School Colleges reopen) झाले आहेत. शाळेत आणि कॉलेजमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची लगबग दिसू लागली आहे. पण त्याच दरम्यान भंडाऱ्यातून (Bhandara) एक धक्कादायक बातमी (Shocking incident) समोर आली आहे. भंडाऱ्यातील एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेजमधून घरी येताच त्याने गळफास (youth hang self) घेतल्याची माहिती समोर आली आहे. (HSC student hang self in Bhandara) मिळालेल्या माहितीनुसार, मृतक विद्यार्थी हा 18 वर्षीय असून तो भंडाऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 12वीत असलेल्या या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. बारावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वाचा :  समीर वानखेडेंना मोठा झटका, नवी मुंबईतील ‘त्या’ बारचा परवाना रद्द एका गरीब परिवारातील हुशार विद्यार्थी असलेला हा तरुण काल मंगळवार (1 फेब्रुवारी) सकाळीच कॉलेजमध्ये गेला होता. कॉलेज आटोपल्यानंतर तो घरी आला. त्यावेळी घरी कुणीच नव्हतं. त्याची आई शेतीकामासाठी बाहेर गेली होती तर वडील जनावरे चारण्यासाठी गेले होते. घरी कुणीही नसल्याचे बघून त्याने आपल्या घरातील स्वयंपाक घरात स्वताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. हा तरुण आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून तो अतिशय हुशार असल्याची माहिती आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. वाचा :  धावत्या कारच्या बोनेटवर बसून तरुणाचा जीवघेणा स्टंट; मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल, पाहा VIDEO घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. एकुलता एक मुलगा असलेल्या मुलाच्या आत्महत्येच्या वृत्ताने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुसाईड नोटमध्ये मोबाईल पासवर्ड लिहित मुंबईतील तरुणीची आत्महत्या जोगेश्वरीत एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असं लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे. जानेवारी महिन्यात हा प्रकार उघडकीस आला. ही तरुणी जोगेश्वरी परिसरात आपल्या वडिलांसोबत राहात होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचं निधन झाल्यानं तिच्या मोठ्या भावाचं लग्न लावून देण्यात आलं. हा भाऊ सध्या विरारला असतो. तिचे वडील फिटर म्हणून काम करत असल्याने कामानिमित्त सतत बाहेर असायचे. याच कारणामुळे अनेकदा ती घरी एकटीच असायची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात