Home /News /mumbai /

'पप्पा, यात पुरावे आहेत; त्याला सोडू नका'; सुसाईड नोटमध्ये मोबाईल पासवर्ड लिहित मुंबईतील तरुणीची आत्महत्या

'पप्पा, यात पुरावे आहेत; त्याला सोडू नका'; सुसाईड नोटमध्ये मोबाईल पासवर्ड लिहित मुंबईतील तरुणीची आत्महत्या

Mumbai Suicide Case: जान्हवी अंधेरीतील कोरोना लसीकरण केंद्रात अटेन्डंट म्हणून काम करायची. तर तिचे वडील पालिकेतील जल विभागात फिटर म्हणून काम करत असल्याने कामानिमित्त सतत बाहेर असायचे

    मुंबई 25 जानेवारी : जोगेश्वरीत जान्हवी विजय चव्हाण नावाच्या 21 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे (Mumbai Girl Commits Suicide). तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये (Emotional Suicide Note) पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असं लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी निखील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जान्हवी जोगेश्वरीच्या रामवाडी परिसरात आपल्या वडिलांसोबत राहात होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचं निधन झाल्यानं तिच्या मोठ्या भावाचं लग्न लावून देण्यात आलं. हा भाऊ सध्या विरारला असतो. जान्हवी अंधेरीतील कोरोना लसीकरण केंद्रात अटेन्डंट म्हणून काम करायची. तर तिते वडील पालिकेतील जल विभागात फिटर म्हणून काम करत असल्याने कामानिमित्त सतत बाहेर असायचे. याच कारणामुळे अनेकदा जान्हवी घरी एकटीच असायची. अकोल्यात सावत्र बापाचं किळसवाणं कृत्य; मुलगी गर्भवती झाल्यानंतर खुलासा! रविवारी रात्रीही साडेबाराच्या सुमारात ते घरी परतले आणि घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, बराच वेळ काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता जान्हवी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडून तिला रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. यात तिने निखील आणि त्याची बहीण अक्षया यांनी आपल्याला त्रास दिल्याचं म्हटलं. सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला. तिने सांगितलं की 'यात सर्व पुरावे आहे, त्यांनी मला फसवलं आणि निखीलने बाहेर संबंध ठेवले. त्याला सोडू नका.' पोलीस सध्या याच अंगाने घटनेचा तपास करत आहेत. Shocking! एकतर्फी प्रेमातून डोळ्यात खुपसला सुरा;तरुणीचं आर्मीचं स्वप्न उद्ध्वस्त जान्हवीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं, ‘सॉरी पप्पा, तुम्हाला एकटं सोडून गेली. मला जायचं नव्हतं; पण सहन होत नव्हतं. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, त्याच्याशिवाय माझं कोणी नव्हतं. मला एकटं वाटायचं तेव्हा मी त्याला फोन करायची; पण तो माझ्या भावनांशी खेळला आणि घरच्यांचे कारण देत मला सोडलं. आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या’.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Suicide case, Suicide news

    पुढील बातम्या