Home /News /national /

बंद खोलीचं गूढ उघड; भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी IAS अधिकारी

बंद खोलीचं गूढ उघड; भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी IAS अधिकारी

Bhaiyyu maharaj suicide case : एक कॉल आला आणि सुसाइड प्रकरणातील गूढ उघड झालं.

    इंदूर, 29 जानेवारी : भय्यू महाराज सुसाइड केसच्या (Bhaiyyu maharaj suicide case) प्राथमिक तपासात हे सर्वसाधारण प्रकरण असल्याचं वाटत होतं. तेव्हा फर्स्ट इन्वेस्टिगेशन ऑफिसर असलेले CSP मनोज रत्नाकर यांनी घरगुती विवादातून सुसाइड केल्याचा रिपोर्ट सादर केला होता. फाइल बंद करण्याची तयारीही सुरू झाली होती. दोन महिन्यांनंतर महाराजांच्या जवळचे वकील निवेज बडजात्या यांना 5 कोटींच्या खंडणीचा कॉल आला. हा धमकीचा कॉल एकेकाळी महाराजांचा ड्रायव्हर असलेल्या कैलाश पाटील याने केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी महाराज यांची सेवा करणारा विनायक, शरद आणि शिष्या पलक यांच्यातील संबंधाचा खुलासा झाला. त्यानेहीदेखील हे मान्य केलं की, अनेकदा महाराज्यांच्या गाडीतून पलक हिला घरातून आश्रमात आणण्याचं काम केलं आहे. गाडीमध्ये ती जे काही विनायक आणि शरदशी बोलत होती, ते त्याच्या लक्षात आहे. याच्या आधारावर पोलिसांनी तीन आरोपी शरद, विनायक आणि पलक यांचा जबाब नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मिळून भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी जबरदस्ती करीत होते. पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आलं की, महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध होते, यातील 2 तर आयएएस आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-भय्यू महाराज प्रकरणी सर्वात मोठी बातमी, तीनही दोषींना शिक्षा जाहीर भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली होती. या प्रकरणात दोन महिन्यांपर्यंत पोलिसांनी काहीच सुगावा लागत नव्हता. तत्कालीन DIG हरिनारायण चारी मिश्र (आता इंदूर पोलीस कमिश्नर) यांचे या प्रकरणात लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. महाराजांची फाइल बंद करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसानेच महाराजांच्या सुसाइडच्या सहा महिन्यानंतर विनायक, पलक आणि शरद यांनी अटक केली. एका फोन कॉलमुळे झाला खुलासा.. भय्यू महाराज सुसाइड केसमध्ये पोलिसांनी सुरुवातील 20 हून अधिक लोकांचा जबाब घेतला होता. कुटुंबातील काही सदस्यांनीही जबाब दिला. यादरम्यान भय्यू महाराज यांच्या जवळचे असलेले आणि गेल्या 22 वर्षांपासून त्यांच्या सोबत असलेले वकील निवेश बडजात्या यांना एक अज्ञात फोन आला आणि त्यांनी 5 कोटींची मागणी केल्यानंतर तपासाला दिशा मिळाली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Indore News, Madhya pradesh, Suicide, गरू Bhaiyyu Maharaj

    पुढील बातम्या