जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Crime news : माजी कर्मचाऱ्याने काढला जुना राग; थेट कंपनीत घुसून CEO आणि MD ला संपवलं; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

Crime news : माजी कर्मचाऱ्याने काढला जुना राग; थेट कंपनीत घुसून CEO आणि MD ला संपवलं; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

माजी कर्मचाऱ्याने काढला जुना राग

माजी कर्मचाऱ्याने काढला जुना राग

Crime news : बेंगळुरूमधील पंपा एक्स्टेंशन अमृतहल्ली येथे असलेल्या एरोनिक्स इंटरनेट या टेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यावर एका माजी कर्मचाऱ्याने तलवारीने हल्ला केला.

  • -MIN READ Bangalore,Karnataka
  • Last Updated :

बंगलोर, 11 जुलै : कर्नाटकची राजधानी आणि आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरूमध्ये दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक वर्ष जुनी टेक कंपनी एरोनिक्स इंटरनेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्यावर कार्यालयात घुसून एका माजी कर्मचाऱ्याने तलवारीने हल्ला केला. या घटनेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वीणूकुमार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी फेलिक्स पूर्वी एरोनिक्स इंटरनेटमध्ये काम करत होता. ती नोकरी सोडून त्याने स्वतःची टेक कंपनी सुरू केली. मात्र, हे दोन्ही लोक त्याच्या व्यवसायात अडथळा आणत होते. या कारणामुळे फेलिक्स याच्या मनात दोघांविषयी खूप राग होता. दरम्यान, रागाच्या भरात त्याने मंगळवारी कंपनीच्या कार्यालयात तलवार घेऊन घुसून फणींद्र व वीनू यांच्यावर जीवघेणा हल्ला करून तेथून पळ काढला. वाचा - 10 वीच्या मुलीवर घरात घुसून अत्याचार, पत्र्याच्या शेडमध्ये गर्भपात, दबाव टाकून.. हल्ल्यानंतर आरोपी फरार ही घटना बेंगळुरू येथील पंपा एक्स्टेंशन अमृतहल्लीच्या सहाव्या क्रॉसवर घडली. आरोपी फेलिक्स एरोनिक्स इंटरनेट कंपनीचा माजी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या माजी बॉसवर खुनी हल्ला केल्यानंतर, तो घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती नॉर्थ ईस्टचे डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी दिली. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. वाचा - मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध; बायकोने मुलासोबत रचला कट अन्.. नाशिक हादरलं या घटनेत आणखी दोन लोकांनी फेलिक्सला मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रसाद म्हणाले, ‘सायंकाळी 4.30 वाजता तीन जणांनी हा हल्ला केला. तिघेही बन्नेरघट्टा रोडवरील एका कंपनीत एकत्र काम करायचे. हल्ला करण्यापूर्वी तो केबिनमध्ये आला आणि सुमारे 30 मिनिटे बोलला. मृत व्यक्तीच्या डोक्यावर व पोटावर चाकूने हल्ला करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात