मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'आमच्या माणसांना मारलं, आता त्यांच्याही कुटुंबाला मारणार', हत्याकांडानंतर बीडमधील वातावरण तापलं

'आमच्या माणसांना मारलं, आता त्यांच्याही कुटुंबाला मारणार', हत्याकांडानंतर बीडमधील वातावरण तापलं

जमिनीच्या वादातून मध्यरात्री घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केज उपजिल्हा रुग्णालय मोठी गर्दी केली.

जमिनीच्या वादातून मध्यरात्री घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केज उपजिल्हा रुग्णालय मोठी गर्दी केली.

जमिनीच्या वादातून मध्यरात्री घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केज उपजिल्हा रुग्णालय मोठी गर्दी केली.

बीड, 14 मे : बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथे जमिनीच्या वादातून मध्यरात्री घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील (Beed Murder Case) मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केज उपजिल्हा रुग्णालय मोठी गर्दी केली. तसंच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांना पाचारण करून गर्दी आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे काहीकाळ रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारधी वस्ती, मांगवडगाव, केज उपजिल्हा रुग्णालय येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'जशी आमची माणसं मारली, तशी त्यांचीही माणसं मारणार, तो पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाहीत,’ अशा शब्दांत मयत पवार कुटुंबातील सदस्यांनी आपला संताप व व्यक्त केला आहे. नातेवाईकांच्या या आक्रमकपणामुळे पोलिसांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी मृतदेह पडून होते, त्या ठिकाणाहून तुम्ही ते मृतदेह का आणले असे पोलिसांना सुनावत नातेवाईक आक्रोश करताना दिसत होते. पोलिसांनी नातेवाईकांची कशीबशी समजूत घालून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. नेमकं काय घडलं? शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. तिथे झालेल्या वादातून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मांगवडगाव इथे घडली असून तिहेरी हत्येनं बीड हादरलं आहे. हेही वाचा - धक्कादायक! बापलेकानं पोलिसाच्या शरीराचे केले तुकडे तुकडे; शिजवून खाल्ले आणि खायलाही घातले मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासणी केली. एकीकडे, कोरोना व्हायरसमुळे वाद बाजूला ठेवून लोक मदत करत असल्याचं दिसत आहे, तर बीडमध्ये रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

पुढील बातम्या