मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Beed : बापानेही वाचवलं नाही, 6 महिन्यात 400 जणांनी केला लेकीवर बलात्कार; 16 वर्षीय मुलीची भयावह कहाणी

Beed : बापानेही वाचवलं नाही, 6 महिन्यात 400 जणांनी केला लेकीवर बलात्कार; 16 वर्षीय मुलीची भयावह कहाणी

जेव्हा मुलगी मदतीसाठी पोलिसांकडे गेली, तर त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला.

जेव्हा मुलगी मदतीसाठी पोलिसांकडे गेली, तर त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला.

जेव्हा मुलगी मदतीसाठी पोलिसांकडे गेली, तर त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 15 नोव्हेंबर : राज्यातील बीड (Beed News) जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलीसोबत तब्बल 6 महिने बलात्कार (Rape for 6 Months) केला जात होता. हैराण करणारी बाब म्हणजे आरोपी कोणी एक नाही तर 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेचं वय 16 वर्षे असून लहान वयात तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं. बलात्कार करणाऱ्यांमध्ये पोलीस (Police) कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. (Beed Even father did not save daughter was raped by 400 people Horrible story of a 16 year old girl ) तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पीडितेवर बलात्कार मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर जेव्हा पीडिता तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती, त्यावेळी तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बीडचे एसपी राजा रामारामी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 2 महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वडिलांनीच दिली नाही जागा... एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. एसपी राजा रामासामी यांनी सांगितलं की, 8 महिन्यांपूर्वी पीडितेचं लग्न लावून देण्यात आलं होतं. मात्र सासरच्या मंडळींनी हुंड्यावरुन तिला त्रास द्यायला सुरुवात केली. पतीदेखील नेहमी तिला मारहाण करीत होता. यामुळे ती वडिलांच्या घरी निघून आली. 6 महिन्यांपूर्वी ती वडिलांच्या घरी निघून आली होती. मात्र वडिलांनी मुलीला घरात राहण्याची परवानगी दिली नाही. यानंतर ती अंबेजोगाई बस स्टँडवर भीक मागत होती. यानंतर तिच्यावर बलात्काराच्या घटना सुरू झाल्या. तिने अनेकदा पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनीही तिचं ऐकून घेतलं नाही. आणि वारंवार तिच्यावर अत्याचार सुरूच होता. हे ही वाचा-औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप ही घटना मन सुन्न करणारी आहे. देशात अजूनही महिलांवरील अत्याचार सुरूच आहे. या 16 वर्षांच्या मुलीवर तब्बल 400 जणांनी बलात्कार केला. पोलिसांकडून योग्य वेळी पाऊल उचलण्यात आले असते तर कदाचित तरुणी सुरक्षित राहिली असती.
First published:

Tags: Beed, Crime news, Gang Rape, Rape

पुढील बातम्या