पाटना, 25 एप्रिल : आजही अगदी सुशिक्षित घरांमधून घरगुती हिंसाचाराच्या घटना समोर येतात. मात्र उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) देवरिया जिल्ह्यातून पती-पत्नीचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीवर छळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. येथे बनकटा भागातील भठही भाट गावातील निवासी मनोव्वर अलीने तक्रारीत पत्नी छळ करीत असल्याचा आरोप केला आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, साधारण एक वर्षांपूर्वी दोघांचं लग्न कुशीनगरमधील पिपरा पोलीस ठाणे हद्दीतील एक गावात झालं होतं. त्याने आरोप केला आहे की, पत्नी त्याचं ऐकत नाही आणि कारणास्तव गावातील लोकांना उलट-सुलट सांगून त्याला मारहाण करीत होती. याशिवाय 112 वर फोन करून पोलिसांना बोलावून मला त्रास देते. याबाबत अनेकदा तिच्या माहेरच्यांना सांगितलं, परंतू त्यांच्याकडूनही कोणीच मदतीसाठी आलं नाही. हे ही वाचा- पत्नीने पतीला दिला अत्यंत क्रूर मृत्यू; थरकाप उडवणारी घटना 23 एप्रिलच्या रात्री साधारण 9 वाजता पत्नीने गावातील काही लोकांकडून त्याला मारहाण केली. यानंतर मारहाण करणारे घरातून पळून गेले. आणि त्यात अंधार असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. एसओ दिलीप सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणात ते तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.