आग्रा, 22 नोव्हेंबर : सिकंदरा भागात धक्कादायक (Shocking News) घटना समोर आली आहे. येथे लग्नाच्या वरातीत बदमाशांनी हैदोस घातला. या चोरांनी नवरदेवाच्या मामाच्या हातातून 12 लाख रुपयांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग (Theft) लंपास केली. या बॅगेत पिढीजात दागिन्यांसह 45 हजार रुपयेदेखील ठेवले होते. पीडितांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. हाथरसमधील गिर्राज कॉलनी निवासी डॉ आकाश सिंहची 20 नोव्हेंबर रोजी आग्रात वरात आली होती. सिकंदरामधील शास्त्रीपुरममधील एकेठिकाणी लग्नाचा (Marriage) समारंभ सुरू होता. 20 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता लग्नापूर्वीचे विधी सुरू होते. कार्यालयाबाहेर वरात नाचत होती. आकाशचे मामा अलिगढ निवासी शिक्षक जितेंद्र पाल सिंह याच्या हातात एक बॅग होती. बॅगेत नवरदेवीचे दागिने आणि कॅश ठेवण्यात आलं होतं. बाईकवरुन दोन बदमाश आले आणि त्यांनी मामा जवळ येताच बाईकची गती कमी केली. मामाच्या हातीतील बॅग खेचून घेतली. मामांनी आरडाओरडा करीत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र बँडच्या आवाजामुळे त्यांचा आवाज कोणाला ऐकू आला नाही. हे ही वाचा- दुर्देवी घटना; मुलाच्या जन्मदिनी केकवरील मेणबत्तीऐवजी आईची चिता जळाली त्यांनी बँड बंद करण्यास सांगितलं. तेव्हा वरातीतील लोकांना याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाजवळी दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचा शोध घेत आहेत. दुर्देवाने घटनास्थळावर येथील सीसीटीव्ही कॅमेरे कव्हर होत नाहीत. यामुळे बदमाशांचा काहीच सुगावा लागणं कठीण झालं आहे. जितेंद्र पाल सिंह यांनी सांगितलं की, बॅगेतील दागिने त्यांच्या बहिणीचे पिढीजात दागिने होते. या दागिन्यांशी त्यांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरवर्षी लग्नाच्या सीजनमध्ये अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी सूर्य नगर कॉलनीत वरातीत अशाच प्रकारची घटना घडली होती. लग्नाच्या सीजनमध्ये मॅरेज होमजवळ अशा प्रकारच्या गँग सक्रिय होतात. आधी संपूर्ण ठिकाणाची रेकी करून चोरी करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.