कानपुर, 26 नोव्हेंबर : कानपूरमध्ये (Kanpur) एका तरुणाने असा प्रकार केला आहे, जे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पत्नी (Wife) माहेरी गेल्याने त्रस्त तरुणाने आपलं गुप्तांग (Private Part) ब्लेडने कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तर त्याने आत्महत्या (Sucide attempt) करण्याचा देखील प्रयत्न केला. त्याने त्याच ब्लेडने गळ्यावर अनेक वेळा वार केले आहेत. तरुणाला रक्ताळलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलवलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
चकेरी पोलीस हद्दीतील मवैया येथे राहणारा 26 वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. 5 वर्षांपूर्वी बाराहदेवी येथे राहणाऱ्या तरुणीसोबत त्याचं लग्न झालं होतं. पत्नी, एक चार वर्षांचा मुलगा आणि वयस्कर आई-बाबा असं त्याचं कुटुंब आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणाच्या पत्नीला डेंग्यू झाला होता. उपचार करण्यासाठी ती माहेरी गेली होती. गेल्या दीड महिन्यांपासून ती माहेरीच होती.
हे ही वाचा-गँगस्टरची बहीण...बुरखा आणि गोळीबार; महिलेने केलेल्या फायरिंगचा Video Viral
माहेराहून पत्नी येत नसल्याने पती त्रस्त
तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, साधारण दीड महिन्यांपासून त्याची पत्नी माहेरी राहत आहे. जेव्हा तरुण पत्नीला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला त्यावेळी पत्नी येण्यास नकार देत होती. याशिवाय ती त्याच्यासोबत फोनवर बोलत नव्हती. तरुणी अशी का वागतेय याचं कोड त्याच्या घरात कोणालाच उलगडत नव्हतं. त्यामुळे तरुण खूप तणावात होता. कोणत्याही कामात त्याचं मन लागत नव्हतं. दिवस-रात्र तो पत्नीचाच विचार करत होता.
हे ही वाचा-लग्नाच्या तयारीदरम्यान महिला कॉन्स्टेबलवर झाडल्या गोळ्या; तरुणाने स्वत:वरही..
प्रायव्हेट पार्ट आणि मानेवर केले वार
बुधवारी रात्री एका खोलीत जाऊन तरुणाने ब्लेडने आपले गुप्तांग कापले. यानंतर त्याने आपल्या गळ्यावर त्याच ब्लेडने अनेकदा वार केले. त्याची आई जेवायला बोलवायला जेव्हा त्याच्या खोलीत गेली तेव्ही तिला धक्काच बसला. मुलगा रक्ताळलेल्या अवस्थेत पडला होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना कळवलं. अहिरवा चौकीचे प्रमुख विजय शुक्ला यांनी सांगितलं की, तरुणाची पत्नी माहेराहून परत येत नव्हती. यामुळे तरुण तणावात होता. तरुणाने गळा आणि गुप्तागं ब्लेडने कापलं आहे. सध्या त्याला हैलट रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे.