Home /News /crime /

भीषण! तरुणाने ब्लेडने स्वत:चच गुप्तांग कापलं; कारण ऐकून परिसरात उडाली खळबळ

भीषण! तरुणाने ब्लेडने स्वत:चच गुप्तांग कापलं; कारण ऐकून परिसरात उडाली खळबळ

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अद्यापही त्याची प्रकृती गंभीर आहे

    हनुमानगड, 23 नोव्हेंबर : राजस्थानच्या (Rajasthan) हनुमानगड (Hanumangarh) नगरात एका युवकाने गुप्तांग (Private Part) कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी एका तरूणाने ब्लेडने स्वत:च्या गुप्तांगाचा भाग कापला, त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत हनुमानगड टाऊनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना हनुमानगड टाऊन रेल्वे स्टेशन जवळील आहे. तरूणाने गुप्तांग कापल्याची घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळ खळबळ उडाली. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी तरूणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तरूण त्यानंतर बेशुद्धीत होता. त्याचवेळी हनुमानगड टाऊन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, तरूण शुद्धीवर आल्यानंतर या घटनेचा पूर्ण खुलासा होईल. हे ही वाचा-'दारू नका पिऊ'.. पत्नीच्या सूचनेला वैतागून गळा चिरून हत्या; मृतदेहावर बसला पती टाऊन पोलिसांनी सांगितलं... टाऊन पोलिसांच्या माहितीनुसार, तो तरुण सध्या अर्धशुद्धीत आहे. परंतु त्याने स्वतः गुप्तांग कापल्याचे सांगितले आहे. त्याच वेळी मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण नगर रेल्वे स्थानकासमोर राहणार आहे आणि तो तरुण मुलींसारखा पोशाख करत असे. मुलगी होण्याच्या इच्छेतून त्याने हे धोकादायक पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सध्या तरूणाची परिस्थिती गंभीर आहे आणि तो पूर्णपणे जागा झाल्यानंतर या घटनेचा नेमका खुलासा होऊ शकेल. हनुमानगड टाऊन पोलीस या घटनेसंदर्भात तरुणाच्या कुटुंबाची चौकशी करत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, हनुमानगड शहरातील या युवकाने गुप्तांग कापल्याच्या केवळ खळबळच उडाली नाही तर त्याबद्दल विविध चर्चा सुरू केल्या आहेत. हा तरूण शुद्धीवर आल्यानंतर सर्व प्रकारचे अनुमान थांबतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर या तरूणाला अधिक चांगले उपचार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, PRIVATE part

    पुढील बातम्या