जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Attack on wife : जेवणात चिकन बनवलं नाही; ठाण्यात पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला

Attack on wife : जेवणात चिकन बनवलं नाही; ठाण्यात पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला

Attack on wife : जेवणात चिकन बनवलं नाही; ठाण्यात पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला

पतीने केलेला चाकुचा हल्ला या पत्नीने चुकविला. मात्र, हा हल्ला चुकवताना ती बाजूला झाली. यामुळे तिच्या मुलीच्या अंगठ्याजवळील बोटाला दुखापत झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 28 मे : पती-पत्नीमधील भांडणं (Husband Wife Dispute) काही नवीन नाहीत. पती-पत्नी भांडणात नंतर गोड होतात. अनेक पती-पत्नींमध्ये वाद हे होतच असतात. मात्र, काही वेळा या वादाचे रुपांतर अनपेक्षित असेही होते. पती-पत्नीमधील वाद किंवा भांडण विकोपाला जाऊन अनर्थ घडल्याच्या बातम्याही (Husband Wife Dispute News) तुम्ही वाचल्या असतील. यातच आता ठाण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं? एका मद्यपी पतीने आपल्या पत्नीवर हल्ला (Attack on Wife) केल्याची घटना समोर आली आहे. हल्ला केल्याचे कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य होणार आहे. जेवणात चिकन (Chicken) बनवून न दिल्याने एका पतीने त्याच्या पत्नीवर हल्ला केला. भरत डांबरे असे 30 वर्षीय पतीचे नाव आहे. तो मद्यपी असल्याची माहितीही समोर आली आहे. आपल्या पत्नीने जेवणात चिकन बनवून दिले नाही, या कारणावरुन मद्यपी पतीने पत्नीवर हल्ला केला. भरत डांबरे याने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करुन तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास वागळे इस्टेट परिसरात घडली. हेही वाचा -  पुणं हादरलं! पोटच्या मुलीवरच जन्मदात्याकडून वारंवार बलात्कार हल्ला चुकवला आणि… पतीने केलेला चाकुचा हल्ला या पत्नीने चुकविला. मात्र, हा हल्ला चुकवताना ती बाजूला झाली. यामुळे तिच्या मुलीच्या अंगठ्याजवळील बोटाला दुखापत झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर श्रीनगर पोलिसांनी (Shrinagar Police Thane) घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात