कोलकाता 23 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Elections 2021) तारखा जवळ येत आहेत. अशात आता राज्यातून हिंसेच्या घटना समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आसनसोलच्या चेलिडंगा परिसरात सोमवारी भिंतींवर लिखाण करण्यावरुन भाजप (BJP) आणि टीएमसी (TMC) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वाद आणि मारहाणीनंतर भाजप समर्थकाच्या घरावर हल्ला झाला आहे. घरावर हल्ला आणि तोडफोड केल्याचा आरोप टीएमसी कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे.
टीएमसी कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून आतमधील सामानसह दुचाकीचीही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या लोकांनी भाजप कार्यकर्त्याच्या 80 वर्षाच्या आईलाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या हल्ल्याबद्दल भाजप नेता अमित मालवीय यांनी टीएमसीवर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलं, की आसनसोलमध्ये भाजप समर्थकाच्या 80 वर्षाच्या वृद्ध आईला टीएमसीच्या गुंडांनी मारहाण केली आहे. कारण, ते परिसरात भिंतींवर लिखाण करुन भाजपचा प्रचार करत होते.
In Asansol’s Chelidanga, an 80 year old woman, mother of a BJP karyakarta, was beaten up by TMC goons just because he is leading BJP’s wall painting campaign in the area. Their house was vandalised and a bike broken...
She is also a daughter of Bengal but TMC wouldn’t spare her! pic.twitter.com/TgwsJf15qr — Amit Malviya (@amitmalviya) March 23, 2021
घटनेनंतर मंगळवारी आसनसोल उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कृष्णेन्दू मुखर्जीदेखील घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनीही आरोप केला, की टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. तर, टीएमसी नेता अभिजीत घटक यांनी मात्र हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
भाजप समर्थकाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आईनं सांगितलं, की त्या लोकांनी धमकी दिली, की आता तुम्हाला इथे राहू देणार नाही. मी किंवा माझ्या मुलांनी असं काय केलं, मलाच माहिती नाही. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केली आहे. त्यांनी मलाही मारहाण केली आहे. त्यांनी माझा हाथ पकडून मला बाहेर ओढत आणलं. या घटनेनंतर आम्ही खूप घाबरलो होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accusation, Attack, BJP, Crime, Mother, TMC, West Bengal bjp, West Bengal Election