जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / प्रेमात त्याचा अडथळा, प्रियकराचं प्रेयसीच्या भावासोबत धक्कादायक कांड

प्रेमात त्याचा अडथळा, प्रियकराचं प्रेयसीच्या भावासोबत धक्कादायक कांड

अटक करण्यात आलेला आरोपी

अटक करण्यात आलेला आरोपी

प्रियकराने प्रेयसीच्या भावासोबत धक्कादायक कांड केले.

  • -MIN READ Local18 Basti,Uttar Pradesh
  • Last Updated :

रहमान, प्रतिनिधी बस्ती, 6 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, बलात्कार तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रिन्स नावाच्या तरुणावर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पाथर भीर गावात गेल्या 4 जूनच्या रात्री ही घटना घडली. येथे प्रिन्स नावाच्या तरुणावर गावाबाहेरील बागेत चाकूने हल्ला करण्यात आला. मोहित नावाच्या तरुणाने प्रिंसवर चाकूहल्ला केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आरोपी मोहितचे राजकुमारच्या मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. 4 जून रोजी एका नातेवाईकाच्या घरी बहुभोजनाचा कार्यक्रम होता, ज्यामध्ये प्रिन्स, विकास, रोशन आणि सनोजही सहभागी झाले होते. तसेच प्रिन्सची मामेबहीणही या कार्यक्रमाला गेली होती. सर्वजण तेथे व्यस्त असताना आरोपी प्रियकर मोहितने प्रेयसीला फोन करून रात्री दोन वाजता गावाबाहेर भेटण्यासाठी बोलावले. तर प्रेयसीचा भाऊ प्रिन्सला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर प्रिन्स आणि त्याचे साथीदार विकास, रोशन आणि सनोज यांनी प्रिन्सच्या बहिणीचा पाठलाग करून प्रियकर मोहितसह तिला पकडले. यानंतर प्रिन्स आणि त्याच्या मित्रांनी प्रियकर मोहितला बेल्ट आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मोहितने चाकू काढून मैत्रिणीचा भाऊ राजकुमार याच्यावर हल्ला केला. चाकूने वार करताच प्रिन्स जमिनीवर कोसळला. यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. यादरम्यान, प्रिन्सचे मित्र त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना मोहितने तेथून पळ काढला. तर जखमी प्रिन्सच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी धाव घेत तक्रार दिली. यानतंर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आशिक मोहितला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एसओ जनार्दन प्रसाद यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेत वापरलेले धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात