गुवाहाटी, 21 फेब्रुवारी : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडांच्या घटनेनंतर पुन्हा एक असेच खून प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या दोन्ही घटना लिव्ह इन रिलेशनशिपमधून हत्या झाल्याची जोरदार चर्चा होत आहे. आसाममध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. पण तिथे हे काम प्रेयसीने केल्याचे आरोप आहेत. पती आणि सासूची हत्या केल्यानंतर महिलेने त्यांचे अनेक तुकडे केल्याचा आरोप आहे. या कामात महिलेला आणखी दोघांनी साथ दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्या महिलेले पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खुनाचा खळबळजनक खुलासा केला आहे.
गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंत बराह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटी शहरातील बंदना कलिता (32) हिने मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये तिचा पती अमरज्योती डे (32) आणि सासू शंकरी डे (62) हे दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरण पोलिसांनी तपास केल्यानंतर कोणतीही माहिती मिळाली नव्हती. दरम्यान, काही दिवसांनी बंदना कलिताने सासूच्या खात्यातून पैसे काढून घेण्यास सुरू केले. यावरून पती अमरज्योतीच्या चुलत भावाने नोव्हेंबरमध्ये बंदनावर संशय व्यक्त करत तक्रार केली होती.
हे ही वाचा : अफेअर, पैसा अन् मर्डर...पत्नीला हवा प्रियकर, लेक पैशांचा भुकेला; दोघांनी रचला भयंकर कट
दरम्यान पोलिसांनी पत्नी बंदनावर संशय आल्याने तिच्यावर पाळत ठेवत मोबाईलवरून आलेल्या कॉल्सची चौकशी केली. यानंतर तिन्ही आरोपींना गुवाहाटी आणि तिनसुकिया येथील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. चौकशीदरम्यान बंदना कलिता हिने हत्या केल्याचे कबून केले. याचबरोबर तिने हत्या करून त्याची कशी विल्हेवाट लावली याबाबत ही माहिती दिली.
पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, बंदना कलिता आणि अमरज्योती यांचा 12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला बंदनाची सासू या नात्याच्या विरोधात होती, नंतर तिने ते मान्य केले. दरम्यान, या जोडप्यात भांडण सुरू झाले. त्यानंतर बंदनाने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान आरोपी बंदनाच्या माहितीनुसार, पती व्यसनाच्या आहारी गेल्याने काहीही कमवत नव्हता यामुळे काम करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती दिली.
बंदनाचा दावा आहे की सुरुवातीला तिच्या सासूने तिला नोकरी करण्यास पाठिंबा दिला पण नंतर तिचाही विरोध सुरू झाला. यानंतर तिने पती आणि सासू या दोघांचाही काटा काढण्याचा निर्णय घेतला. या कामात बंदनाने आपले सहकारी धंती डेका (32) आणि अरुप डेका (27) यांना सहभागी करून घेतले. ठरल्यानुसार मागच्या वर्षी 26 जुलै रोजी सासू शंकरी डे यांची उशीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे 3 तुकडे करत मेघालयातील काही ठिकाणी फेकुन दिले.
हे ही वाचा : लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर, 17 ऑगस्ट रोजी बंदनाने तिच्या दोन साथीदारांसह तिचा पती अमरज्योती याचा घरात रॉडने हल्ला करून खून केला. हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे 5 तुकडे करून पुन्हा मेघालयातील विविध भागात फेकून दिले. बंदनाच्या टोकावर सासू शंकरी डे यांच्या मृतदेहाचे अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत. ते आता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Gang murder, Murder news