मेक्सिको, 3 फेब्रुवारी: घरात शिरताना चुकून काच फुटल्याबद्दल (Breaking Window) दिलगिरी (Apology) व्यक्त करत एका चोराने (Thief) 200 डॉलरची ($200) नुकसान भरपाई (Reimbursement) दिली. मेक्सिकोतील एका घरातून पळ काढताना हा चोरटा नुकसानभरपाईची रक्कम मालकासाठी ठेऊन गेला. काही वेळाने या चोरट्याला अटकही झाली, मात्र त्याचा दर्यादिलीची चर्चा मेक्सिकोत चांगलीच रंगली होती.
अशी घडली घटना
मेक्सिकोत राहणाऱं एक कुटूंब काही कामासाठी शहराबाहेर गेलं होतं. घर रिकामं असल्याचं पाहून एक चोरटा खिडकीतून घरात घुसला. आत येताना त्याने खिडकी फोडली आणि अलगद एका बेडरुममधून घरात प्रवेश केला. घरात आल्यानंतर त्याने तिथल्या वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेतला. घरातील व्यक्ती परत येईपर्यंत थोडा आराम करावा आणि थोडं खाणंपिणं उरकून घ्यावं, असा बेत त्याने आखला होता आणि तो तडीस नेला.
चोरी नाहीच, फक्त घुसखोरी
या चोरट्यानं घरातील एकही वस्तू चोरून नेली नसल्याचं तपासात स्पष्ट झालं. चोरट्याने घरात आल्यावर सर्वप्रथम बाथरूम गाठलं. बाथरुममधील बाथटबचा यथेच्छ उपयोग करत त्याने अगोदर अंघोळ उरकली. त्यानंतर घरातील फ्रिजमध्ये असणारी बिअर बाहेर काढली आणि आपला घसा ओला करून घेतला.
जेवण आणि झोप
एवढं सगळं झाल्यावर त्याला भूकेची जाणीव होऊ लागली. मग घरातील फ्रिजमध्ये आणि इतरत्र असणारे पदार्थ त्याने घेतले आणि पोटभर जेवण केलं. जेवण झाल्यावर त्याला आली झोप. मग त्याच घरातल्या मोठ्याशा बेडवर त्यानं अंग टाकलं आणि काही तास आराम केला. एवढं सगळं झाल्यावर तो एकदम फ्रेश झाला आणि तिथून निघण्याचा निर्णय त्याने घेतला.
जाताना ठेवले पैसे
घरातून निघताना त्याला खिडकीची फुटलेली काच दिसली. आपल्यामुळे या खिडकीची काच फुटल्याचं त्याला फारच वाईट वाटलं. त्याने खिशातून 200 डॉलर काढले आणि खिडकी तोडल्याची नुकसानभरपाई म्हणून घरातील टीपॉयवर ठेवले.
हे वाचा- सावधान! 'हा' कीडा ठरणार जगाच्या विनाशाचं कारण? शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
पोलिसांना दिली कबुली
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी याच चोरट्याने एका महिलेला धमकी देत तिच्या कारमधून खाली उतरायला भाग पाडलं आणि तिची कार घेऊन पोबारा केला. महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.