जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / धक्कादायक! क्लासला जाणाऱ्या 10 वीच्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जाळलं

धक्कादायक! क्लासला जाणाऱ्या 10 वीच्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जाळलं

क्राइम

क्राइम

आरोपींमध्ये चारपैकी तीन जण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत पीडित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • -MIN READ Karnataka
  • Last Updated :

कर्नाटक : सायकलवरुन जाणाऱ्या 10 वीच्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जाळलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या क्लासला सायकलवरुन जात असताना ही घटना घडली. आरोपींमध्ये चारपैकी तीन जण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत पीडित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेश घडली असल्याची माहिती मिळाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यावर पेट्रोल शिंपडून पेटवून देण्यात आलं. शुक्रवारी पहाटे तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांनी पीडितेला आग लावल्याने दहावीतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी क्लाससाठी सायकलवरून जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील चार आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत.

Yavatmal News : 5 दिवसांच्या बाळाला दिले बिब्याचे चटके, अघोरी प्रकारानं महाराष्ट्र हादरला

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आरोपींनी मुलाला अडवलं आणि त्याच्यासोबत हा भयंकर प्रकार केला. आग लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पीडित मुलाचं नाव के यू अमरनाथ असल्याची माहिती मिळाली आहे. मृत्यूपूर्वी पीडितने आरोपींची नाव सांगितली आहे. त्यापैकी एक मजूर असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी व्यंकटेशची छोटी बहीण अल्पवयीन आहे. या बहिणीने गैरवर्तन केल्यानं पीडित तिला ओरडला. याच कारणातून व्यंकटेश आणि पीडित यांच्यात वाद झाले. या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहेत.

Wardha Bogus Seed : आता ‘एसआयटी’ खोदणार बनावट बियाणांची पाळेमुळे; 15 सदस्‍यांची नियुक्‍ती

मुलाच्या पालकांनी नंतर वेंकटेश्वर आणि तीन अल्पवयीन मुलांवर आत्मदहनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिस तक्रार दाखल केली. चेरकुपल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि पाठलाग संबंधित कलमे जोडली. पोलिसांनी पॉक्सो कायद्याचाही वापर केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात