चंदीगड, 14 डिसेंबर : पंजाबमधील (Punjab News) जलंदर येथून एक बातमी समोर आली आहे. सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन सुरू आहे. मात्र या लग्नांमध्ये (Marriage Season) अनेक ठिकाणी चोरीच्याही घटना घडत असल्याचं समोर येत आहे. पंजाबमधील जलंदर येथील दरोडा गार्डनमध्ये सुरू असलेल्या लग्नाच्या समारंभादरम्यान एक सुटबूट घालून आलेला मुलगा एक पैशांनी भरलेली बॅग चोरी करून पळत असल्याचं दिसलं. तब्बल 11 वर्षांच्या या मुलाने लग्न सोहळ्यादरम्यान मुलीच्या हातात असलेली पिशवी अवघ्या 10 सेकंदात चोरी केली. या पिशवीत तब्बल दीड ते दोन लाखांची कॅश होती.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुजेजमध्ये तब्बल 11 वर्षीय मुलगा पैशांनी भरलेली पिशवी घेऊन जात असताना दिसत आहे. लग्ना समारंभातून पैशांची पिशवी गायब झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. मिळालेल्या माहितीनुसार, साधारण रात्री 12 वाजेपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र जेव्हा नवरदेवीला स्टेजवर आणण्यात आलं तेव्हा कुटुंबीय फोटो काढण्यासाठी येऊ लागले. यादरम्यान त्यांनी पैशांनी भरलेली स्टेजवरच ठेवली. काही सेंकदानंतर ते परत स्टेजवर गेले तर तेथे पैशांची बॅग नव्हती. तेथील इतर नातेवाईकांना विचारलं तर कोणालाच त्या बॅगेबद्दल माहिती नव्हतं. या रेसॉर्ट मॅनेजरला याबाबत माहिती देण्यात आली.
हे ही वाचा-बापरे! गर्लफ्रेंडचे ‘डोळे उघडून’ लुटले 18 लाख, चोरीची पद्धत वाचून बसेल धक्का
पीडिता कुटुंबाने रेसॉर्टमध्ये लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला. तर स्टेजवळून एका 11 वर्षांच्या मुलाने पैशांनी भरलेली बॅग उचलल्याच दिसलं. मुलाने ती बॅग घेतली आणि तो थेट बाहेर पडला. यानंतर रस्ता क्रॉस करून त्याने ती बॅग कोणाला दिली, हे मात्र सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसू शकलं नाही.
विशेष म्हणजे हा मुलगा कोट-पँट घालून लग्नात सामील झाला होता. यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच चोरीचा घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांनी कार्यक्रमादरम्यान अधिक सावध राहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Marriage, Punjab