भिवंडी, 21 सप्टेंबर : भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील बीएनएन कॉलेजमधील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. पण, त्याच्या मृत्यू आधीचा व्हिडीओ समोर आला असून मित्रांनी त्यांचा मोबाईल चोरला असल्याचे यात दिसून आले आहे. त्यामुळे नदीत बुडून मृत्यू झाला की घातपात याचा पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित गुप्ता असं बुडून मृत्यू झाल्यालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. भिवंडी शहरातील बीएनएन कॉलेजमध्ये 12 वीत शिकणारे चार विद्यार्थी अजंठा कंपाऊंड येथील विहिरीमध्ये पोहाण्यासाठी गेले होते. पोहत असताना अमित गुप्ता हा विद्यार्थी वरती आलाच नाही. त्यामुळे त्या विद्यार्थांनी कोणालाही न सांगता घरी निघून गेले. मात्र अमित हा घरी आला नसल्याने याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र तो मिळाला नाही. ( शिंदे सरकारची मोठी घोषणा, लॉकडाऊनमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे ) त्यामुळे गुप्ता कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना तपास केला असता 24 तासाने तो अजंठा कंपाउंड येथील विहिरीत पोहण्यासाठी गेल्याने बुडाल्याचे समजले. (जन्मदात्या आईने 3 वर्षीय चिमुकलीला मारून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकलं, पालघरमधील धक्कादायक घटना) मात्र त्यावेळी अमितच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले की, आम्ही एक तास पोहत होतो मात्र पोलिसांनी विहिरी जवळील सीसीटीव्ही तपासले असताना त्यामध्ये चौघे विद्यार्थी भिंतीवरून उडी मारून जातात आणि पुन्हा काही वेळाने येतात त्यानंतर एक विद्यार्थी पुन्हा जातो अमितचा मोबाईल घेतो. त्यामुळे अमितच्या मृत्यूला वेगळे वळण लागले असून त्याचे आजोबा उमा शंकर गुप्ता यांनी सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.