वॉशिंग्टन, 25 फेब्रुवारी : काही जण ऑफिसधील सततच्या कामाला इतके कंटाळतात की त्यांना कोणत्याही परिस्थितीत सुट्टी (Holiday) हवी असते. अनेकदा ऑफिसात काम जास्त असल्यानं त्यांना बॉसकडून सुट्टी मिळत नाही. त्यामुळे सुट्टी मिळवण्यासाठी खोटं कारण पुढं करणाऱ्यांची संख्या कमी नाही. काही महाभाग तर सुट्टीसाठी गैरमार्गाचा देखील वापर करतात. अशाच एका 19 वर्षाच्या तरुणाला त्यानं रचलेल्या खतरनाक कटामुळे पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
अमेरिकेतील (United States) मधील एरिझोना (Arizona) मधील हा सर्व प्रकार आहे. ब्रँडन सुल्स असं या 19 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. तो एका टायरच्या कारखान्यात काम करत होता. याबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपलं दोन व्यक्तींनी अपहरण (Kidnap) केल्याचा दावा ब्रँडननं केला होता. दोन जणांनी आपल्याला बेशुद्ध करुन एका वाहनात नेलं आणि अज्ञात स्थळी फेकून दिलं, असा ब्रँडनचा दावा होता. हाताला पट्टा बांधलेल्या आणि तोंडात कापडाचा गोळा घातलेल्या अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेलं त्याला एका व्यक्तीनं पाहिलं, असंही ब्रँडननं सांगितलं होतं.
(हे वाचा : मुलाच्या मृतदेहावरील जखमांवर माऊलीने रात्रभर केले उपचार, त्याने जीव गमावल्याचं सकाळी आलं लक्षात )
पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती समजताच त्यांनी या अपहरणाचा तपास सुरु केला. त्यावेळी त्यांना हे दुसरंच प्रकरण असल्याचं लक्षात आलं. ब्रँडनचं अपहरण झालंच नव्हतं, तर त्यानं अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली होती. तपास पथकानं अनेक फुटेज तपासल्यानंतर ब्रँडननं अपहरणाची खोटी माहिती दिल्याचे सिद्ध झाले.
‘आपलं अपहरण झालं नव्हतं, तर सुट्टी मिळावी म्हणून हा खतरनाक कट रचला होता,’ अशी कबुली ब्रँडननं दिली आहे. पोलिसांची दिशाभूल करणे आणि त्यांना खोटी माहिती देणे या आरोपावरुन या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची आता जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, International, Kidnapping, Shocking news, United States of America