मरणही परवडेना! स्मशानात जाण्यासाठी उकळले बक्कळ पैसे; रुग्णवाहिका चालकाला अटक

मरणही परवडेना! स्मशानात जाण्यासाठी उकळले बक्कळ पैसे; रुग्णवाहिका चालकाला अटक

Corona Outbreak: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अनेक निष्पाप लोकांचे हकनाक जीव जात (Corona death) आहेत. अशा संकटकाळात काहीजण मात्र मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे: कोरोना विषाणूच्या साथीनं (Corona pandemic) सध्या देशात हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या (Corona cases in India) झपाट्यानं वाढत आहे. अशात कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. यामध्ये निष्पाप लोकांचे हकनाक जीव जात (Corona death) आहेत. अशा संकटकाळात काहीजण मात्र मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतील एका रुग्णवाहिका चालकानं रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत 6 किमी अंतर जाण्यासाठी तब्बल 14 हजार रूपये (Ambulance driver demand 14000 rs fare to go 6KM) उकळले आहेत. त्यामुळे कोरोना काळात मरणही परवडत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना काळात वैद्यकीय सुविधा देणाऱ्या विविध व्यावसायिकांचा काळाबाजार यापूर्वीच चव्हाट्यावर आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनपासून अगदी ऑक्सिजन बेड मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. अशात दिल्लीतील कंधी लाल नामक रुग्णवाहिका चालकानं मृताच्या नातेवाईकांना वेठीस धरून पैसे उकळण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. त्याने रुग्णालयापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असणाऱ्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी 14 हजार रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून आरोपी रुग्णवाहिका चालकाला अटक केली आहे.

संबंधित आरोपी अशा पद्धतीनं रुग्णाच्या नातेवाईकाकडून भरमसाठ पैसे आकारत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपी चालकाला फोन करून मरण पावलेल्या रुग्णाचा मृतदेह दिल्लीतील न्यु लाईफ रुग्णालयापासून निगम बोध घाटापर्यत न्यायचं असल्याचं कळवलं. यावेळी आरोपी कंधी लाल यानं 14 हजार रुपये लागतील असं सांगितलं आणि पैशासाठी चिठ्ठी पाठवली.

हे ही वाचा-कोरोनामधील आतापर्यंतचं देशातील अत्यंत दुर्देवी दृश्य; VIDEO पाहून मनस्ताप होईल!

यानंतर पोलिसांनी सापळा रचून रुग्णवाहिका चालक आरोपी कंधी लाल याला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत असून त्याने कोरोना काळात आणखी किती जणांना लुटलं आहे. याचा तपास घेतला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 11:53 AM IST

ताज्या बातम्या