मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चंदीगडनंतर IIT मुंबईत धक्कादायक प्रकार, बाथरुममध्ये विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याचा कर्मचाऱ्यावर आरोप

चंदीगडनंतर IIT मुंबईत धक्कादायक प्रकार, बाथरुममध्ये विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याचा कर्मचाऱ्यावर आरोप

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 सप्टेंबर : चंडीगड विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आयआयटी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 (H10) च्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. रविवारी रात्री ही घटना घडली आहे, अशी तक्रार तिने केली. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पिंटू गरिया, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आयआयटी मुंबईने दिले निवेदन - या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅंटीनमध्ये काम करणारा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. या कर्मचाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीकडे असलेल्या फोनमध्ये कोणते फुटेज आहे, याबाबत आम्हाला अद्याप काहीही माहिती नाही. तसेच कँटीनला तत्काळ बंद करण्यात आले आहे आणि आता केवळ महिला कर्मचारी असताना ही सुरू राहणार आहे. दरम्यान, आरोपीने ज्या पाईपचा वापर केला आहे, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आला असून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहोत. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू, असेही आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे. हेही वाचा - चंडीगडमध्ये MMS लिक प्रकरण! अशा परिस्थितीत महिलांचे कायदे आणि अधिकार माहितीय का? दरम्यान, वसतिगृहाचे कँटीन पूर्वी पुरुष कर्मचारी चालवत होते. संस्थेने या प्रकरणावर त्वरित कारवाई केली आहे. आयआयटी मुंबईमधील बाथरूमकडे जाणारा रस्ता सील करण्यात आला आहे. वसतिगृह विभाग H10 चा तपास केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती आयआयटी मुंबईचे डीन प्रोफेसर तपनेंदू कुंडू यांनी दिली.
First published:

Tags: Crime news, IIT, Mumbai

पुढील बातम्या