जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Daund Crime : 2 मुलांना विहिरीत फेकलं, पत्नीचा दाबला गळा; डॉक्टरने स्वतःसह संपवलं कुटुंब, पुणे हादरलं

Daund Crime : 2 मुलांना विहिरीत फेकलं, पत्नीचा दाबला गळा; डॉक्टरने स्वतःसह संपवलं कुटुंब, पुणे हादरलं

डॉक्टरने संपवलं कुटुंब

डॉक्टरने संपवलं कुटुंब

Daund Murder : पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यात एका क्षणात अख्ख कुटुंब संपल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुकाच नाही तर जिल्हा हादरला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

सुमित सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 20 जून : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःसह संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे. सोन्यासारखं कुटुंब एका क्षणात संपवलं.. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42)  पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), अदिवत अतुल दिवेकर (वय 9) वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी यांची नावे आहेत. दौंड तालुक्यातील वरवंड येथे हे कुटुंबं वास्तव्यास होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की वरवंड येथील गंगासागर पार्कमध्ये घर क्रमांक 201 मध्ये राहत्या घरी ही घटना घडली. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) आणि पल्लवी अतुल दिवेकर (वय 39) यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी आढळले. व्यवसायानी डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबला. नंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या करुन कुटुंबच संपवलं. विहिर खोल असल्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यास अडचण येत आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. वाचा - पत्नीशी झाला वाद अन्…., या अवस्थेत मिळाला तरुणाचा मृतदेह या घटनेने वरवंड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास उपनिरिक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, दत्तात्रय टकले, हनुमंत भगत करीत आहेत. डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने जनावरांचे डॉक्टर होते. तर पत्नी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात