मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बायकोच्या त्रासामुळे नवऱ्याला घ्यायचा होता घटस्फोट, पण ती द्यायची धमक्या, अखेर घडलं भयानक

बायकोच्या त्रासामुळे नवऱ्याला घ्यायचा होता घटस्फोट, पण ती द्यायची धमक्या, अखेर घडलं भयानक

आशिष कुमार

आशिष कुमार

आशिष कुमार हा महालेखापाल कार्यालय, चंदीगडमध्ये लेखापरीक्षण अधिकारी म्हणून सेवेत होता.

  • Local18
  • Last Updated :
  • Patna, India

मनोज सिन्हा, प्रतिनिधी

पाटणा, 27 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच खूनाच्या घटना समोर येत आहेत. चोरी तसेच आर्थिक फसवणुकीचेही प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाटण्यात एका ऑडिट अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. नातेवाइकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. आशिष कुमार (वय-35, रा. गुड की मंडी, अरफाबाद कॉलनी) असे मृताचे नाव आहे. आशिष कुमार हा महालेखापाल कार्यालय, चंदीगडमध्ये लेखापरीक्षण अधिकारी म्हणून सेवेत होता.

ही घटना पाटणाच्या शहरातील आलमगंज पोलीस स्टेशन परिसरातील गुड की मंडी अरफाबाद कॉलनी परिसरातील आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून आशिषने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. आशिष कुमारचे फुलवारीशरीफ येथील रहिवासी राजबालासोबत दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, पण लग्न झाल्यापासून दोघांचे संबंध चांगले नव्हते. पती-पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे, त्यामुळे आशिष कुमारने गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेबद्दल विचारले असता, मृताचा लहान भाऊ आनंद कुमार यांनी सांगितले की, आशिष कुमार हा चंदीगडहून 6 दिवसांपूर्वीच त्याच्या घरी परतला होता आणि तो खूप अस्वस्थ होता. त्याने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ आपल्या पत्नीच्या छळामुळे खूप दुखावला होता आणि त्याला तिच्यापासून घटस्फोटही घ्यायचा होता. पण घटस्फोट देण्याऐवजी राजबाला त्यांना वेगवेगळ्या धमक्या देत असे, त्यामुळे त्यांचा मोठा भाऊ खूप डिप्रेशनमध्ये होता.

या संपूर्ण प्रकरणात आलमगंज पोलीस ठाण्याच्या निरीक्षक विद्या राणी यांनी लेखापरीक्षण अधिकाऱ्याने आत्महत्येला प्रथमदर्शी दुजोरा देत कुटुंबीयांच्या जबाबावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime, Death, Local18, Patna