जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मॅट्रिमोनी साईटवर परिचय नंतर लग्न; अनोळखी कॉलने फुटलं पत्नीचं भांड, महिला निघाली 5 हजार गाड्यांची चोर

मॅट्रिमोनी साईटवर परिचय नंतर लग्न; अनोळखी कॉलने फुटलं पत्नीचं भांड, महिला निघाली 5 हजार गाड्यांची चोर

पत्नी चोर असल्याचं समजल्यानंतर पतीला धक्काच बसला

पत्नी चोर असल्याचं समजल्यानंतर पतीला धक्काच बसला

जेव्हा विमलने रीता चव्हाण या महिलेबाबत गुगलवर सर्च केलं तेव्हा त्याला धक्काच बसला. या महिलेवर चोरी, हत्या आणि कार चोरीचा गुन्हा दाखल होता.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

अहमदाबाद, 16 फेब्रुवारी : विचार करा जर कोणी मॅट्रिमोनी साईटवरून आपल्यासाठी जीवनसाथी शोधला आणि त्याच्यासोबत लग्न केलं. मात्र त्यानंतर काही दिवसांनी माहिती पडलं की आपली पत्नी ही कोणी सामान्य व्यक्ती नसून एक अट्टल चोर आहे. तिच्यावर चोरी, हत्या आणि पाच हजार कारच्या स्मगलिंगचा आरोप आहे तर पतीची काय अवस्था होईल? अशीच एक घटना गुजरातच्या पोरबंदरमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे या महिलेने यातील अनेक गुन्हे हे तिच्या पहिल्या पतीसोबत मिळून केले आहेत. सहा महिन्यानंतर पत्नी गायब दैनिक भास्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार पोरबंदरमधील जालाराम कुटीर येथे राहणाऱ्या विमल करिया याचा परिचय गुवाहाटीमध्ये राहात असलेल्या रीता दास नावाच्या महिलेसोबत मॅट्रोमोनी साईटवरून झाला. आपण घटस्फोटीत असल्याचं रीताने विमलला सांगितलं. त्यानंतर त्यांचा परिचय वाढला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विमलने लग्नापूर्वी रिताकडे घटस्फोट झाल्याच्या कागदपत्रांची मागणी केली, मात्र तीने त्यावर बोलणं टाळलं. आपलं लग्न हे खूप कमी वयात झालं होतं, त्यामुळे लग्नाचा एकही पुरावा नसल्याचं तीनं आपला होणारा पती विमलला सांगितलं. त्यानंतर विमलने तिच्यावर विश्वास ठेवून अहमदाबादमध्ये तिच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर आपल्याला आसाममध्ये जमिनीच्या कागदापत्रासंबंधी काही काम असल्याचं सांगत तीने विमलचं घर सोडलं. हेही वाचा :  कोपरखैरणेमधील ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं; सुरक्षारक्षकानेच महिलेला संपवलं वकिलाचा फोन त्यानंतर काही दिवस ती आसाममधून तिचा पती विमलला फोन करत होती. मात्र अचानक तिचा फोन येणं बंद झालं. एक दिवस विमल याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने सांगितलं की आपन रीताचा वकील बोलत असून, रीताला पोलिसांनी अटक केलं आहे, तिच्या जमानतिसाठी एक लाख रुपये हवे आहेत. विमलला वाटलं की ती हे प्रकरण आसाममधील त्या जमिनीचं असावं, त्याने रीताच्या खात्यात एक लाख रुपये पाठवले. मात्र जेव्हा तिच्या वकिलाने विमलला जामिनाचे ऑनलाईन कागदपत्र पाठवले तेव्हा विमलच्या पायाखालची जमीनच सरकली. रीताचं खर नाव रीता दास नसून रीता चव्हाण असल्याचं त्याला कळालं तसेच तिला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचं देखील समोर आलं.

News18लोकमत
News18लोकमत

रीतावर अनेक गुन्हे जेव्हा विमलने रीता चव्हाण या महिलेबाबत गुगलवर सर्च केलं तेव्हा त्याला धक्काच बसला. या महिलेवर चोरी, हत्या आणि कार चोरीचा गुन्हा दाखल होता. ती एका आतंरराष्ट्रीय कार चोराची पत्नी होती. त्यानंतर विमलने रीताला कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने त्याचा कॉल उचलला नाही. नंतर या महिलेने आपला दुसरा पती विमल याचा कॉल ब्लॉक लिस्टमध्ये टाकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात