मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भयंकर! 2 विद्यार्थिनींवर बलात्कार केल्यानंतर आरोपीच्या पत्नीने केला फोन, दिली देह विक्रय व्यवसायाची ऑफर

भयंकर! 2 विद्यार्थिनींवर बलात्कार केल्यानंतर आरोपीच्या पत्नीने केला फोन, दिली देह विक्रय व्यवसायाची ऑफर

मुलींवर बलात्कार केल्यानंतर त्यांनी मुलींकडून 10 हजारांची मागणी केली.

मुलींवर बलात्कार केल्यानंतर त्यांनी मुलींकडून 10 हजारांची मागणी केली.

मुलींवर बलात्कार केल्यानंतर त्यांनी मुलींकडून 10 हजारांची मागणी केली.

कन्नोज, 27 सप्टेंबर : कन्नोज येथील सरायमीरा तिर्वा क्रॉसिंग स्थित एका कॅफेमध्ये (Gang Rape in Cafe) फोटोकॉपी करण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थिनींना 4 तरुणांनी अपहरण करीत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींपैकी एकाने बलात्कार (Gang Rape) करतानाच व्हिडीओ शूट केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत 10 हजार रुपयांची वसुली केली. या प्रकरणात पोलिसांनी एक महिलेसह 6 जणांंविरोधात पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी सोमवारी सांगितलं की, या पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने निलेश, कमल, रामदास, नरेंद्र, निलेश याची पत्नी आणि नरेंद्रच्या एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (After raping 2 female students the accuseds wife made a phone call and offered prostitution)

फोटो कॉपी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनींचं अपहरण

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने सांगितलं की, 13 सप्टेंबर रोजी दुपारी तब्बल 12 वाजता ती आपल्या मैत्रिणीसह निलमणी कॅफेमध्ये फोटोकॉपी घेण्यासाठी गेली होती. तेथे निलेश, कमल, रामदास आणि नरेंद्र यांनी दोघींना कॅफेच्या एका खोलीत नेलं आणि येथे त्यांच्यावर बलात्कार केला.

हे ही वाचा-प्रियकराची प्रेयसीसोबत फाशी, एकमेकांसोबत लग्न न झाल्याने टोकाचा निर्णय

व्हिडीओ शूट करून 10 हजारांची वसुली

गुन्हा नोंदविल्यानुसार, नरेंद्रने घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि आपल्या भावोजींकडे सोपवला. यानंतर त्याच्या भावोजींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 हजार रुपयांची वसुली केली. त्यानंतर विद्यार्थिनीने घरातून 10 हजार रुपये चोरून त्या मुलांना दिले.

पोलीस म्हणाले, लवकरच होणार अटक

पोलीस अधिक्षक प्रशांत वर्माने सांगितलं की, एका महिलेसह 6 लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस वारंवार प्रयत्न करीत आहे.

प्राथमिक तपासात पोलिसांनी या कॅफेमध्ये देह विक्रय ( prostitution) व्यापार सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. एका पीडितेने सांगितलं की, बलात्कारानंतर निलेशची पत्नी तिच्यासोबत फोनवर देहविक्रय व्यवसाय करण्याबद्दल सांगत होती आणि यासाठी दबाव आणत होती. आसपासच्या लोकांनी कॅफेमध्ये अनेक तरुणी सतत ये-जा करीत असल्याचं सांगितलं आहे.

First published:

Tags: Gang Rape, Rape