मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /करावं तसं भरावं! पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

करावं तसं भरावं! पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

पती-पत्नीच्या (Husband-wife) किरकोळ वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली.

पती-पत्नीच्या (Husband-wife) किरकोळ वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली.

पती-पत्नीच्या (Husband-wife) किरकोळ वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली.

चंदीगड, 07 फेब्रुवारी: पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या एका पतीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास एका युवकाने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो कार घेवून पळून जात होता. काही अंतरावर गेला असता, आरोपी पतीच्या कारची मालवाहू ट्रकला जोरात धडक बसली. या भीषण अपघातात आरोपीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील खरड एनक्लेव येथील आहे. आरोपी युवक हा नोएडा येथील रहिवाशी असून त्याचं नाव वारीस कामद्दीन असं आहे. आरोपी गेल्या एक महिन्यापासून पत्नी वर्षा चौहान सोबत एनक्लेव येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. तर गेल्या काही दिवसांपासून दोघांत दररोज काही ना काही वाद सुरू होता.

हे ही वाचा-अमरावतीत 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

गुरुवारी रात्रीही यांच्या दोघांत कोणत्या तरी कारणामुळे वाद झाला होता. हा वाद इतका वाढत गेला की, आरोपीने त्याच्या पत्नीची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांच्या भितीमुळे आरोपीने स्वतः ची कार घेवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर गेल्यानंतर सारंगपूरजवळ त्याची कार एका मालवाहू ट्रकला जावून धडकली. हा अपघात इतका भयानक होता की, आरोपी युवकाचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली आहे. त्यानंतर घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना दिली. मृतकाचे नातेवाईक जेव्हा घरी पोहचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की, रक्ताने माखलेल्या स्थितीत पत्नी बाथरुममध्ये पडली होती. त्यानंतर तिला त्वरित रुग्णालयात हलवण्यात आलं, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. एनक्लेव पोलीस ठाण्याचे प्रमुख हर्ष गौतम यांनी महिलाची हत्या आणि हत्याप्रकरणातील आरोपी पतीचा रस्ते अपघातात मृत्यू या दोन्ही घटनांची पुष्टी केली आहे. पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेला सिलेंडर मिळाला आहे, ज्यावर आरोपी वारीसच्या बोटांचे ठसे मिळाले आहेत. याच अधारावर पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Road accident