• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • अखेर ती निर्दयी आई सापडली, बाळाला लाथा-बुक्क्यांनी केली होती मारहाण

अखेर ती निर्दयी आई सापडली, बाळाला लाथा-बुक्क्यांनी केली होती मारहाण

अनैतिक संबंधांबाबत पतीसोबत वाद (TN Woman extramarital affair) झाल्यानंतर या महिलेने आपल्या एक वर्षाच्या बाळाला मारहाण केली होती. तिने या सर्व प्रकाराचा व्हिडीओही (Woman beating up child) तयार केला होता. त्या निर्दयी आईचा आता शोध लागला आहे.

  • Share this:
चेन्नई, 30 ऑगस्ट : पती-पत्नीमधील वादामुळे कित्येक वेळा त्यांच्या लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महाराष्ट्रातील एका महिलेचा आपल्या बाळाला मारहाण करतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर तमिळनाडूमधील एका महिलेचाही (TN Woman beating child) असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तुलसी असं या महिलेचं नाव होतं. अनैतिक संबंधांबाबत पतीसोबत वाद (TN Woman extramarital affair) झाल्यानंतर तिने चक्क आपल्या एक वर्षाच्या बाळाला मारहाण केली होती. तिने या सर्व प्रकाराचा व्हिडीओही (Woman beating up child) तयार केला होता. या व्हिडीओमध्ये आपल्या रडणाऱ्या बाळाकडे पाहून ती चक्क हसताना दिसत होती. आता या महिलेचा शोध लागला आहे. आंध्र प्रदेशातील सिंधूर गावात राहणाऱ्या तुलसीचे तमिळनाडूमधील जिंजी (Gingee woman beating up child) जिल्ह्यात राहणाऱ्या वाडीवाळगनसोबत (Vadivazhagan) 2016 मध्ये लग्न झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून कामाच्या निमित्ताने वाडीवाळगन चेन्नईमध्ये राहत होता. तर तुलसी जिंजी जिल्ह्यातील मेत्तुर गावात राहत होती. या दोघांना प्रदीप (1) आणि गोकुळ (3) नावाची दोन मुलं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाडीवाळगन चेन्नईमध्ये राहत असताना तुलसीचं दुसऱ्या एका व्यक्तीसोबत (TN woman extramarital affair) सूत जुळलं होतं. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाडीवाळगनने तिला या व्यक्तीसोबत बोलण्यास मज्जावही केला होता. यावरुन त्यांच्यात वादही झाले होते. या सगळ्यात तीन महिन्यांपूर्वी तुलसीने एक वर्षांच्या प्रदीपला (Woman beat up own child) अमानुष मारहाण केली होती. या प्रकाराचा व्हिडीओही तिने तयार केला होता.

लग्नानंतर 4 दिवसातच युवकाचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटनेनं साताऱ्यात खळबळ

या व्हिडीओमध्ये (TN woman beating own child) तुलसी प्रदीपच्या तोंडावर चक्क बुक्के मारताना दिसत आहे. ते बाळ मोठ्याने रडत असूनही तुलसी पुढे त्याला लाथही मारते. एवढं सगळं करुन वर ती बाळाकडे बघून हसत होती. पूर्ण व्हिडीओमध्ये एक वर्षाचं बाळ वेदनेने रडत असूनही, तुलसीला त्याचं काहीच वाटत नाही. हा धक्कादायक व्हिडीओ (TN mother beat up kid) पाहिल्यानंतर वाडीवाळगनने तुलसीला याचा जाब विचारला. मात्र, यावर काहीही स्पष्टीकरण न देता, ती थेट आपल्या माहेरी निघून गेली.

दुसऱ्या पत्नीला खूश करण्यासाठी केला पोटच्या लेकीचा खून

यानंतर वाडीवागळनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर (TN mother viral video) शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून केवळ तमिळनाडूच नाही, तर देशभरातील लोकांना धक्का बसला आहे. अनेकांकडून हा व्हिडीओ शेअरही केला जात आहे. दरम्यान, ही दोन्ही मुलं सध्या वाडीवागळनसोबत सुरक्षित आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या निर्दयी आईचा आता शोध लागला असून पुढील कारवाई सुरू आहे.
First published: