पानीपत, 8 डिसेंबर : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर तरुणाई सोशल मीडियाचा वापर करते. मात्र, अनेकदा याच सोशल मीडियामुळे मोठे गुन्हेदेखील घडताना दिसतात. आजकाल सोशल मीडियाचा वाढता ट्रेंड अत्यंत घातक ठरत आहे. सोशल मीडियावर दिसणार्या झगमगाटामुळे तरुणाई त्यांच्या आयुष्याचे निर्णय या सोशल मीडियावरच घेतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण -
दिल्लीतील एका मुलीची इन्स्टाग्रामवर पानिपतमधील एका मुलाशी मैत्री झाली. काही काळानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष देऊन पानिपतच्या तरुणाने तरुणीसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नाला नकार दिला. तरुणाच्या या कृत्यानंतर मुलगी दिल्लीहून थेट पानिपतला आली आणि तिने रात्री उशिरा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पानिपतमध्ये मुलीने सांगितले की, ती दिल्लीची रहिवासी आहे आणि सुमारे 1 वर्षापूर्वी तिची इन्स्टाग्रामवर पानिपतमध्ये राहणाऱ्या विशूशी मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. विशूचे त्याच्या घरी येणे-जाणेही वारंवार होऊ लागले. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचे मान्य केले. लग्न करण्याबाबत बोलून विशूने मुलीसोबत शारीरिक संबंधही ठेवले आणि त्यानंतर आईच्या सांगण्यावरून त्याने लग्नास नकार दिला.
हेही वाचा - गर्लफ्रेंड तिच्या मित्रासोबत नाचली, प्रियकराने रागाच्या भरात तरुणाला चाकूने केले जखमी
प्रियकर फोनवर लग्नाला नकार देत असताना, तरुणी दिल्लीहून पानिपत बसस्थानकावर पोहोचली आणि शहर पोलीस ठाण्यासमोर तब्बल 1 तास गोंधळ सुरू होता. विशू आणि त्याची आई तिथे पोहोचल्यावर मुलीने विशूसोबत लग्नाचा हट्ट धरायला सुरुवात केली. वारंवार नकार दिल्याने तरुणीने धारदार वस्तूने हाताची नस कापली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला पानिपत येथील सामान्य रुग्णालयात आणले.या मुलीवर उपचार सुरू आहेत. विशूने तिच्याशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल, असा इशारा मुलीने दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Instagram, Social media