मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भाजप युवा मोर्चाच्या नेत्यानंतर आणखी एका हत्येने मँगलोर हादरलं, CCTV मध्ये कैद झाला हत्येचा थरार

भाजप युवा मोर्चाच्या नेत्यानंतर आणखी एका हत्येने मँगलोर हादरलं, CCTV मध्ये कैद झाला हत्येचा थरार

दुकानाबाहेर सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे.

दुकानाबाहेर सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे.

दुकानाबाहेर सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे.

    मँगलोर, 28 जुलै : मँगलोर पोलिसांनी गुरुवारी भाजप युवा मोर्चाचे नेता प्रवीण नेट्टारू यांच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. शफीक बल्लेरे आणि जाकिर सवानुरु अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्या हत्येच्या काही तासात मँगलोरमधून आणखी एक हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा आणि प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा काहीही संबंध नाही. ही हत्या मँगलोरजवळील सुरखाटा भागात घडली. फझील यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. अज्ञात मुलं कारमधून आणि चौघांनी फझीलवर हल्ला केला. त्याच्या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये हत्येचा थरार दिसून येत आहे. Video मध्ये तुम्ही पाहू शकता की, फझील एका मित्रासह दुकानाबाहेर उभा आहे. त्यानंतर एका कारमधून अज्ञात व्यक्ती येतात आणि त्याच्यावर हल्ला करू लागतात. यादरम्यान त्याच्यासोबत असलेली व्यक्तीही पळू लागेत. या हल्ल्यात फझीलचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Karnataka, Murder

    पुढील बातम्या