जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीनं स्वतःला मृत घोषित केलं, एका फोटोमुळे 15 वर्षांनी सत्य आलं समोर

जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीनं स्वतःला मृत घोषित केलं, एका फोटोमुळे 15 वर्षांनी सत्य आलं समोर

जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीनं स्वतःला मृत घोषित केलं, एका फोटोमुळे 15 वर्षांनी सत्य आलं समोर

आगीत हत्येचा आरोप असणारा एक व्यक्तीही मारला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. इतकंच नाही तर पोलिसांना आरोपीचं मृत्यू प्रमाणपत्रही (Death Certificate) मिळालं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

वाराणसी 20 मार्च : उत्तर प्रदेशच्या व्हिकटोरिया पार्कमधील जळितकांडात 10 एप्रिल 2006 रोजी 67 लोक जिवंत जळाले (People Died in Fire Breaks Out at Victoria Park) होते. या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले होते. याच आगीत हत्येचा आरोप असणारा एक व्यक्तीही मारला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. इतकंच नाही तर पोलिसांना आरोपीचं मृत्यू प्रमाणपत्रही (Death Certificate) मिळालं होतं. मात्र, पंधरा वर्षांनंतर सत्य समोर आलं तेव्हा पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आरोपीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र मिळालं, यात असं लिहिलं होतं, की अनिराज सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र गुरुवारी बुलंदशहर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं. जेव्हा पोलिसांनी याबाबत चौकशी केली, तेव्हा सत्य समोर आलं. आरोपीनं सांगितलं, की हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यानं बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवून घेतलं आणि स्वतःलाचा मृत घोषित केलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हिकटोरिया पार्क जळीतकांडात स्वतःचा मृत्यू झाल्याचं दाखवत आरोपीनं पंधरा वर्ष पोलिसांची दिशाभूल केली. अनिराजच्या कुटुंबीयांनी 2006 सालीच पोलिसांना त्याच्या मृत्यूचं प्रमाणपत्र दिलं. त्यांनी व्हिकटोरिया पार्क जळीतकांडात अनिराजचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी हे प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलं. 2020 मध्ये अनिराजच्या गावातील काही लोकांनी माहिती दिली, की अनिराज जिवंत आहे. आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्याविरोधात सरधना ठाण्यात बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. सोबतच पोलिसांनी अनिराजवर 20 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं. बुलंदशहर पोलिसांच्या टीमनं अनिराजला गुरुवारी कसबा स्याना इथून ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान माहिती मिळाली, की जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यानं मृत्यूचं बनावट प्रमाणपत्र तयार केलं. हा आरोपी सध्या उत्तराखंडच्या रुद्रपूर येथे आपल्या पत्नी आणि मुलांसह राहून गार्डची नोकरी करत होता. सोळा वर्ष त्यानं गुरुग्राम, नोएडा, मेरठ आणि रुद्रपूरमध्ये नोकरी केली. 2004 साली अनिराज काही दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. ठरलेल्या दिवशी तो तुरुंगात न परतल्यानं पोलिसांनी तपास सुरू केला मात्र तो कुठेही आढळला नाही. अनिराजच्या कुटुंबीयांनी त्याचं मृत्यू प्रमाणपत्र सादर केलं. यानंतर पोलिसांनी तपास बंद केला. जन्मठेप आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी अनिराजनं आपलं नाव आणि रुप पूर्णपणे बदललं. सोळा वर्षात त्यानं गुरुग्राम, नोएडा, मेरठ, रुद्रपूर अशी अनेक शहरं बदलली. बहुतेक ठिकाणी त्यानं सुरक्षा रक्षकाची नोकरी केली. आयजी प्रवणी कुमार यांनी सांगितलं, की पंधरा वर्ष स्वतःला मृत घोषित करणारा अनिराज एका फोटोमुळे पकडला गेला. दोन वर्षापूर्वी आपल्याल भाच्याच्या एका कार्यक्रमासाठी तो गढ़मुक्तेश्वर क्षेत्रातील एका गावात गेला. याठिकाणी फोटोसेशनही झालं. हे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आणि महावीरपुर गावातील लोकांनी त्याला ओळखलं. यानंतर त्याचा तपास सुरू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात