पुणे, 18 ऑगस्ट : पुण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 13 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना उघडकीस आणली. हा विद्यार्थी मंगळवारी त्याच्या शाळेसमोरून बेपत्ता झाला होता. यानंतर तो पुणे रेल्वे स्टेशनवर सापडला. मुलाच्या वडिलांनी देहू रोड पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची FIR दाखल केली होती. मंगळवारी दुपारी देहू रोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी आधी मुलाचा चेहरा कपड्याने झाकला आणि त्याचं अपहरण केलं. धक्कादायक! ऑनलाईन रमीच्या व्यसनात गमावले पैसे, पुण्यात नैराश्यातून युवकाची आत्महत्या संध्याकाळ झाली तरी मुलगा शाळेतून घरी न आल्याने कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेले. यानंतर पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. पुढील काही तासातच मुलगा पुणे रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांची टीम तातडीने रेल्वे स्टेशनवर पोहोचले. येथे बेपत्ता झालेला विद्यार्थी सापडला. यानंतर मुलाला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलं.
विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, FIR दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर योगेश गायकवाड यांनी सांगितलं की, या प्रकरणात तपास सुरू आहे.