जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेयसी आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडून पळून गेला प्रियकर, ‘सत्य’ समजल्यावर सरकली पायाखालची जमीन

प्रेयसी आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडून पळून गेला प्रियकर, ‘सत्य’ समजल्यावर सरकली पायाखालची जमीन

प्रेयसी आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडून पळून गेला प्रियकर, ‘सत्य’ समजल्यावर सरकली पायाखालची जमीन

आपलं लग्न झाल्याची माहिती लपवून ठेऊन एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण (Love affair) करणारा आणि त्यातून मूल झाल्यावर जबाबदारी सोडून पळ काढणाऱ्या एका तरुणामुळे तरुणी रस्त्यावर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 14 जुलै : आपलं लग्न झाल्याची माहिती लपवून ठेऊन एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण (Love affair) करणारा आणि त्यातून मूल झाल्यावर जबाबदारी सोडून पळ काढणाऱ्या एका तरुणामुळे तरुणी रस्त्यावर आली आहे. लवकरच लग्न करण्याच्या बहाण्याने या तरुणानं तरुणीसोबत लिव्ह-इनमध्ये (Live-in Relationship) राहायला सुरुवात केली. त्यानंतर बळजबरीनं तिच्याशी शारीरिक संबंध (Physical relations) प्रस्थापित केले. मात्र ती तरुणी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर मात्र त्यानं जबाबदारी झटकून पळ काढला. अशी झाली फसगत मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये निलेश नावाच्या एका तरुणाची पीडित तरुणीसोबत ओळख झाली. काही दिवसांतच त्यांची ओळख वाढली आणि ही तरुणी तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांनी एक भाड्याचं घर घेऊन तिथं एकत्र राहायला सुरुवात केली. या काळात आपण विवाहित असल्याची माहिती या तरुणाने लपवून ठेवली. काही दिवसांनी ही तरुणी गर्भवती राहिली. ती सात महिन्यांची गर्भवती असताना हा तरूण अचानक घर सोडून पळून गेला. काही महिन्यांनी तरुण परतला पत्नी गर्भवती असताना तरुण पळून गेल्यानंतर या महिलेनं एका मुलीला जन्म दिला. ही मुलगी 5 महिन्यांची झाल्यावर तो पुन्हा परत आला. आपण विवाहित असून आपल्याला एक मुलगा असल्याची कबुली या तरुणानं दिली. मात्र तरीही तरुणीसोबत लग्न करून दुसरी पत्नी म्हणून नातं पुढे सुरु ठेवायला त्यानं तयारी दाखवली. पुढची तीन वर्षं तो या महिलेसोबत राहिला आणि त्यानंतर पुन्हा गायब झाला. तरुणी कमावती नसल्यामुळे घरभाडं भरणं तिला शक्य होत नव्हतं. अखेर घरमालकांनी तिला निलेशच्या मूळ गावी म्हणजेच गोसलपूरला नेलं. हे वाचा - धक्कादायक! गोड बोलून कारमध्ये बसवलं अन् निर्जनस्थळी नेत दांड्यानं केली मारहाण कुटुंबीयांनी केली मारहाण गोसलपूरमध्ये या तरुणीला पाहताच तिला स्विकारणं तर दूरच, पण निलेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला आणि घरमालकाला बेदम मारहाण केली. निलेशची पत्नी, आई आणि भावानं या तिघांना चोप देऊन तिथून हाकलून दिलं. यामुळं हतबल झालेल्या तरुणीनं अखेर एका मंदिरात आसरा शोधला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी ही तरुणी गेली असता पोलिसांनी तिच्याच चारित्र्याबाबत संशय व्यक्त करत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचं तिनं सांगितलं आहे. माध्यमांनी याबाबत पोलिसांना विचारणा केली असता या तरुणीनंच तरुणाविरुद्धची तक्रार मागे घेतल्याची माहिती पोलीस देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात