मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीच्या बाइकवरुन उतरून वडिलांच्या गाडीवर बसली महिला; 5 मिनिटांनंतर होत्याचं नव्हतं झालं आणि...

पतीच्या बाइकवरुन उतरून वडिलांच्या गाडीवर बसली महिला; 5 मिनिटांनंतर होत्याचं नव्हतं झालं आणि...

भावाचा वाढदिवस असल्याने सर्वजण खूप आनंदात होते, मात्र हा आनंद फार काळ राहू शकला नाही

भावाचा वाढदिवस असल्याने सर्वजण खूप आनंदात होते, मात्र हा आनंद फार काळ राहू शकला नाही

भावाचा वाढदिवस असल्याने सर्वजण खूप आनंदात होते, मात्र हा आनंद फार काळ राहू शकला नाही

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 24 जानेवारी : वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये जेवण करुन परतणाऱ्या कुटुंबासोबत दुर्देवी घटना घडली. भावाच्या वाढदिवसासाठी महिला खूप खूश होती. माहेरच्यांबरोबर ते एकत्र जेवायला गेले. हॉटेलातून परतत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आणि अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झालं. स्पीड ब्रेकरवरुन बाइक घसरली आणि मागे बसलेली महिला रस्त्यावर डोक्याच्या दिशेने पडली. गंभीर अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रविवारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या पाच मिनिटांपूर्वीच महिला पतीच्या गाडीवरुन वडिलांच्या गाडीवर बसली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला. हे ही वाचा-मध्यरात्री चेक करीत होता ईमेल; INBOX मध्ये जे पाहिलं त्यामुळे झोपूच शकला नाही हजारीतील पंचशील नगर येथे राहणारे देवेंद्र विमल हे मूळचे भिंडचे आहेत. ते एका सिक्युरिटी कंपनीत काम करतात. शनिवारी देवेंद्र यांची पत्नी 26 वर्षीय पिंकी विमल आपल्या माहेरी हजीराला आली होती. तिच्या भावाचा वाढदिवस होता. यासाठी शनिवारी संपूर्ण कुटुंब गाड्यांवर जुन्या छावणीतील एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. जेव्हा ते पार्टी करुन घरी परतत होते, तेव्हा अर्ध्या रस्त्यापर्यंत ती पती देवेंद्र याच्या बाइकवर होती. मात्र अल्लगढा चौकात पाच मिनिटांपूर्वी ती पतीची गाडी सोडून वडिल जामेंद्र सिंह यांच्यावर गाडीवर बसली, कारण तिला तेथूनच माहेरी जायचं होतं. आता कुठे त्यांनी मल्लगढा चौक क्रॉस केला होता की स्पीड ब्रेकरवर त्यांचं गाडीवर नियंत्रण गेलं. बाइक उडाल्यानंतर मागे बसलेली पिंकीदेखील रस्त्यावर पडली. आणि वडील गाडीवर सरकले होते. घटनास्थळाहून 100 पाऊलांच्या अंतरावर हजारी पोलीस स्टेशन होतं. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं. रविवारी सकाळी 8 वाजता पिंकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लहान मुलं म्हणतात, बाबा, आई कधी येणार? या अपघातात मृत्यू झालेल्या पिंकीला दोन मुलं आहेत. प्रांशू आणि 4 वर्षांची सृष्टी आहे. या अपघातात त्यांच्या डोक्यावर आईचं छत्र हरपलं आहे. वारंवार ते वडिलांकडे आई केव्हा येणार असल्याचं विचारत आहेत.

First published:

Tags: Road accident

पुढील बातम्या