पाटना, 26 डिसेंबर : बिहारमध्ये (Bihar News) रविवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपुर जिल्ह्यातील बेला फेज-2 मध्ये नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटल्यामुळे भीषण स्फोट (Blast) झाला. यावेळी फॅक्टरीत अनेक मजूर काम करीत होते. आतापर्यंत सर्वच मृतांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आलेली नाही. त्याशिवाय अनेकांचे मृतदेह भयावह स्थिती सापडले आहेत. कोणाचा फक्त हातच सापडला तर कोणाचा फक्त पाय. (Boiler explodes at noodles factory in Bela Phase-2 in Muzaffarpur district) मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे शेजारी फॅक्टरीदेखील उद्ध्वस्त झाली आहे. यावेळी तेथे काम करणारे दोघेजणं देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमींची अद्याप ओळख पटवण्यात आलेली नाही. या प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले या घटनेचा तपास करण्यासाठी पाटन्याहून अधिकाऱ्यांची टीम बोलवण्यात आलेली आहे. हे ही वाचा- …अन् दोन गटांनी एकमेकांच्या घरांना लावली आग, दोन संसारं जळून खाक, कारण समोर 5 किमीपर्यंत गेला स्फोटाचा आवाज.. स्फोटाचा आवाज साधारण 5 किमीपर्यंत लांब गेल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूडल्स फॅक्ट्री पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सध्या घटनास्थळी 5 फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या आहेत. ..असं वाटलं की भूकंप आला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की, स्फोटाच्या आवाजाने जमिन हादरली. काहींना वाटलं की भूकंप आला. काहीजणं तर आपल्या घरातून बाहेर पडले. काही वेळानंतर फॅक्ट्रीमधील बॉयलर फुटल्याचं कळालं. या स्फोटात 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. यांना नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणाप आहे.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.