जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / चप्पल बाजूला काढून ठेवली अन् वैनगंगा नदीत उडी घेतली! भंडाऱ्यातील घटनेने हळहळ

चप्पल बाजूला काढून ठेवली अन् वैनगंगा नदीत उडी घेतली! भंडाऱ्यातील घटनेने हळहळ

भंडाऱ्यातील घटनेने हळहळ

भंडाऱ्यातील घटनेने हळहळ

मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने नैराश्यात नदीत उडी घेऊन केली आत्महत्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 19 मार्च : नुकतेच ‘चांगल्या कंपनीत, मोठ्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळत नाही’ असं म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना आता भंडाऱ्यात एक घटना समोर आली आहे. मात्र, इथे परिस्थिती वेगळी आहे. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने नैराश्यात वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार भंडारा शहरालगत असलेल्या कारधा पुलावर घडला आहे. या घटनेनंतर मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काय आहे प्रकरण? मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने नैराश्यात वैनगंगा नदीत उडी घेतली. दरम्यान लोकांना हा प्रकार दिसला असता लोकांनी दोरीच्या सहाय्याने बचावाचा प्रयत्न केला. मात्र, तो विफल ठरला आहे. भूषण पालटकर (वय 50 वर्ष राहणार भंडारा शहर) असे मृताचे नाव आहे. भंडारा शहरातील रहिवासी असलेले भूषण हे काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होते. दरम्यान आज त्यांनी वैनगंगा नदीवरील ब्रिटीश कालीन पुलावर जात आपल्या जवळील सायकल व जोडे काढून ठेवत पुलावरून सरळ नदीत उडी घेतली. तर जवळच असलेल्या लोकांना ही बाब लक्षात घेताच भूषण यांना दोरीच्या सहायाने वाचविण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या हा प्रयत्न अपयशी ठरला. अखेर भूषण यांचा बुडून मृत्यू झाला. याची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह पाण्याबाहेर काढत शवविच्छेदन करिता पाठविले आहे. पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहे. वाचा - जालन्यातील तृतीयपंथीयांचं तरुणासोबत भयंकर कांड; पुण्याला नेऊन बनवलं स्त्री पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये ही घटना काल (18 मार्च) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे. विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या 27 वर्षाच्या अभियंता तरुणाचे नाव आहे. विरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनिअर या पदावर कार्यरत होता. मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेला विरेन जाधव हा चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत सध्या राहत होता.

News18लोकमत
News18लोकमत

विरेन जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नोटबुकमध्ये आपण आत्महत्या का करत आहे, याबद्दल लिहून ठेवलं आहे. ‘मला चांगल्या कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी आहे, तरी मला आनंद मिळत नाही’ असं लिहून वीरेन जाधव याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितलं आहे. त्याने राहत्या घराच्या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात