जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / HDFC बँकेतील NRI चे अकाऊंट लुटण्याचा प्रयत्न, 3 कर्मचाऱ्यांसह 12 जणांना अटक

HDFC बँकेतील NRI चे अकाऊंट लुटण्याचा प्रयत्न, 3 कर्मचाऱ्यांसह 12 जणांना अटक

HDFC बँकेतील NRI चे अकाऊंट लुटण्याचा प्रयत्न, 3 कर्मचाऱ्यांसह 12 जणांना अटक

एचडीएफसी बँकेत असणारं एनआरआय व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे लुटण्याचा (A gang attempting online cyber fraud arrested by police) प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : एचडीएफसी बँकेत असणारं एनआरआय व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे लुटण्याचा (A gang attempting online cyber fraud arrested by police) प्रयत्न करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने गेल्या अनेक दिवसांपासून निष्क्रीय असलेल्या एका बँक (NRI bank account) खात्यातील रक्कम लंपास करण्याचा डाव या टोळीने आखला होता. बँकेतील 3 कर्मचाऱ्यांनादेखील त्यांनी यासाठी हाताशी धरले (Three bank employees involved) होते. मात्र सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला. अशी होती योजना दिल्लीतील एचडीएफसी बँकेत एका NRI व्यक्तीचे खाते होते. या खात्यावर मोठी रक्कम जमा होती आणि अनेक दिवसांपासून खात्यावर कुठलेही व्यवहार झाले नव्हते. त्यामुळे या खात्यातील पैसे लुबाडण्याची योजना चोरट्यांनी आखली. त्यासाठी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपये देण्याचं अमिष दाखवत या कामात सहभागी करून घेतलं. खात्यात केली फेरफार बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारांनी त्या खात्याचे तपशील मिळवले. त्यानंतर खातेधारकाच्या मोबाईल नंबरशी मिळताजुळता नंबर मिळवत खात्यातील तपशीलातही बदल करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एकूण 66 वेळा या खात्यावर लॉग-इन करण्यात आलं. इतक्या वेळा लॉग-इन झाल्यामुळे संशय निर्माण झाला आणि पोलिसांनी चौकशी सूरू केली. हे वाचा- रिझर्व्ह बँकेने SBI ला ठोठावला 1 कोटींचा दंड, पाहा ग्राहकांवर काय होणार परिणाम पोलिसांनी घेतला शोध पोलिसांनी टेक्निकल फुटप्रिंट आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात 20 ठिकाणी छापमारी केली आणि 12 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून संबंधित खात्याचं चेकबूकदेखील पोलिसांनी जप्त केलं आहे. या कटातील मास्टरमाइंडला हे खातं अनेक दिवसांपासून संबंधित खात्यात अनेक दिवसांपासून पैसे पडून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अनेकजणांना या कटात सहभागी करून घेण्यात आलं. मात्र सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीला आला आहे. बँकेतील कर्मचारीदेखील या कटात सहभागी असल्याचं समजल्यावर बँकेच्या व्यवस्थापनालाही जबर धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात