मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मोबाईलसाठी सख्ख्या भावाचा खून, घरातच गाडला मृतदेह, 22 दिवसांनी रहस्य उघड

मोबाईलसाठी सख्ख्या भावाचा खून, घरातच गाडला मृतदेह, 22 दिवसांनी रहस्य उघड

आपल्या भावानं (Brother) स्वतःसाठी मोबाईल (mobile) घेतला, मात्र आपल्याला घेतला नाही, या रागातून धाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या (murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे.

  • Published by:  desk news

लखनऊ, 10 ऑगस्ट : आपल्या भावानं (Brother) स्वतःसाठी मोबाईल (mobile) घेतला, मात्र आपल्याला घेतला नाही, या रागातून धाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या (murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे. फावड्याने वार करून भावाची हत्या केल्यानंतर घरातच त्याचा मृतदेह दफन (dead body burried) केला. मात्र 22 दिवसांनी गावात दुर्गंधी सुटल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला.

अशी घडली घटना

उत्तर प्रदेशमधील फतेहपूर ढोला गावात दोन भाऊ एका घरात राहत होते. थोरला भाऊ फरमाननं त्याच्या वाढदिवशी नवा मोबाईल आणला. तर त्यावेळी रहमान नावाचा त्याचा 16 वर्षांचा धाकटा भाऊ हट्टाला पेटला. आपल्यालाही मोबाईल हवा आहे, अशी मागणी करू लागला. फरमान आणि रहमान यांची या विषयावरून जोरदार भांडणं झाली. त्यावेळी रहमाननं फरमानच्या डोक्यात फावड्याने वार केले.

मृतदेहाचे दफन

फावड्याचा वार वर्मी लागल्यामुळे फरमानचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी रहमाननं त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि घरातच खड्डा खणून ते दफन केले, अशी बातमी ‘दैनिक भास्कर’नं दिली आहे. त्यानंतर सुमारे तीन आठवडे रहमान खुलेआम गावात फिरत होता. कुणी भावाविषयी विचारणा केलीच, तर तो मजुरीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचं सांगत असे. त्यामुळे कुणालाच संशय आला नाही. मात्र या घटनेच्या 22 व्या दिवशी गावात भयंकर दुर्गंधी पसरली. ग्रामस्थांनी याची तक्रार पोलिसांत केल्यानंतर पोलिसांनी दुर्गंधीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी रहमानच्या घरातून वास येत असल्याचं दिसून आल्यानंतर पोलिसांनी रहमानकडे विचारणा केली.

हे वाचा -दीर आणि वहिनीचं प्रेमप्रकरण, घरच्या त्रासाला कंटाळून दोघांनीही खाल्लं विष

पोलिसी खाक्या दाखवताच रेहमाननं तोंड उघडलं आणि खुनाची कबुली दिली. सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

फरमान आणि रहमानला तीन बहिणी आहेत. त्यांची लग्नं झाल्यामुळे त्या सासरी राहायच्या. दोघांचे आईवडिल अगोदरच वारले असल्यामुळे सध्या घरात दोघंच राहायचे. धाकट्या रहमानच्या पालनपोषणाची जबाबदारी फरमाननं घेतली होती. त्याच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी तो मजुरी करत असे. मात्र मोबाईल न मिळाल्याच्या रागातून रहमानने आपल्या भावाचाच जीव घेतला.

First published:

Tags: Brother murder, Crime, Uttar pardesh