जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / दीर आणि वहिनीचं प्रेमप्रकरण, घरच्या त्रासाला कंटाळून दोघांनीही खाल्लं विष, दीराचा मृत्यू

दीर आणि वहिनीचं प्रेमप्रकरण, घरच्या त्रासाला कंटाळून दोघांनीही खाल्लं विष, दीराचा मृत्यू

दीर आणि वहिनीचं प्रेमप्रकरण, घरच्या त्रासाला कंटाळून दोघांनीही खाल्लं विष, दीराचा मृत्यू

आपल्या दीरासोबत (brother in law) घर सोडून पळून गेलेल्या तरूणीने त्याच्यासह विषप्राशन (poison) केल्याने दीराचा मृत्यू (Death) झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पटना, 10 ऑगस्ट : आपल्या दीरासोबत (brother in law) घर सोडून पळून गेलेल्या तरूणीने त्याच्यासह विषप्राशन (poison) केल्याने दीराचा मृत्यू (Death) झाला आहे. तरुणीची तब्येत गंभीर असून तिच्यावर उपचार (treatment) सुरु आहेत. रेल्वे स्टेशनवर विष खाऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दोघांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे. बिहारमधील हरनौत परिसरात ही घटना घडली असून तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या तरुणीचे राकेश नावाच्या तरुणाशी लग्न झाले होते. मात्र राकेशचे अगोदरच एक लग्न झाले असल्याचं या तरुणीला समजलं. त्यावरून तिची राकेशसोबत भांडणं होऊ लागली. त्यानंतर राकेश आणि त्याचे कुटुंबीय तरुणीकडे हुंड्याची मागणी करून तिला मारहाण करत असत. या काळात तिचा दीर तिच्या बाजूने उभा राहत असे आणि तिला मारहाण करायला विरोध करत असे. यामुळे दीरासोबत या तरुणीचे सूर जुळायला सुरूवात झाली. या गोष्टीची कल्पना तरुणीच्या पतीला आल्यानंतर त्याची दीरासोबत कडाक्याची भांडणं झाली आणि दीरानं घर सोडून गावातच दुसरं घर भाड्याने घेतलं. या घरात दीर आणि वहिनीची सर्वांपासून लपून भेट होत असे. एक दिवस पतीने पत्नी आणि दीराला एकत्र खोलीत पाहिलं. त्यानंतर पुन्हा एकदा कडाक्याची भांडणं झाली. तरुणी आणि दीराने आपल्या प्रेमाची सर्वांसोबत जाहीर कबुली दिली आणि जन्मोजन्मी आपण साथ राहणार असल्याचं सांगत ते दिल्लीला निघून गेले. हे वाचा - ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच घोटला गळा, Live-in पार्टनरकडून तरुणीची हत्या तरुणीच्या आईची तक्रार या प्रसगानंतर तरुणीच्या आईने आपली मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पोलिसांनी या तरुणीचा शोध सुरू केला. पोलीस आपला शोध घेत असल्याचं समजल्यावर या दोगांनी पुन्हा गावी येण्याचा निर्णय घेतला. मात्र गावी पोहोचताच रेल्वे स्टेशनवर दोघांनीही विष खाऊन एकत्र मरण्याचाही निर्णय घेतला. विष खाऊन बेशुद्ध अवस्थेत रेल्वे स्टेशनवर पडलेल्या या दोघांना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणीवर उपचार सुरू आहेत, अशी बातमी ‘दैनिक भास्कर ’ने दिली आहे. या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात