मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /हातावर मेंदी लावल्याने 9 वर्षांच्या मुलीची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल 

हातावर मेंदी लावल्याने 9 वर्षांच्या मुलीची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल 

मेंदीच्या वासामुळे मुलीला नेमकं काय झालं?

मेंदीच्या वासामुळे मुलीला नेमकं काय झालं?

मेंदीच्या वासामुळे मुलीला नेमकं काय झालं?

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची असते. शारीरिक समस्या निर्माण होण्यासाठी कोणता घटक कधी आणि कसा कारणीभूत ठरेल हे सांगता येत नाही. दिल्लीत अशाप्रकारची एक घटना घडली. नऊ वर्षांच्या मुलीने मेंदी लावल्यानंतर एपिलेप्सी अर्थात अपस्मारचे झटके येऊ लागले. मेंदीच्या वासामुळे हे झटके येऊ लागल्याचं सांगितलं जात आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण हा एक दुर्मीळ प्रकार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता या मुलीची प्रकृती स्थिर आहे.

  दिल्लीतील एका नऊ वर्षांच्या मुलीने हातांवर मेंदी लावली आणि त्यानंतर तिला सातत्याने अपस्माराचा झटका येऊ लागला. मेंदीच्या वासामुळे या मुलीला झटका येत असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं असता, मेंदी लावलेला हात नाकाजवळ नेताच तिला अपस्माराचा झटका येत असल्याचं दिसून आलं. डॉक्टरांना हा प्रकार लगेच लक्षात आला. अपस्माराचा झटका येण्यामागे असलेले हे कारण अत्यंत दुर्मीळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या रुग्णाची केस क्लिनिकल न्यूरोफिजिओलॉजीच्या अंकात नुकतीच प्रकाशित झाली आहे.

  शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत तर नाही ना? वेळीच व्हा सावध

  या मुलीवर उपचार करणारे गंगाराम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे डॉक्टर पी.के. सेठी यांनी सांगितले की, ``ही रिफ्लेक्स एपिलेप्सीची दुर्मीळ आणि असामान्य केस आहे. रिफ्लेक्स एपिलेप्सीमध्ये एखाद्या सुगंधाचा ट्रिगर बसल्याने सातत्याने अपस्माराचा झटका येतो. मात्र इतर अपस्माराचा झटका सहसा विनाकारण उद्भवतो. या मुलीला मेंदी लावल्यानंतर सातत्याने अपस्माराचा झटका येत होता. या मुलीला केवळ हात आणि पायांवर मेंदी लावल्यामुळे झटका येत नव्हता तर मेंदीच्या सुगंधामुळे शारीरिक उत्तेजना वाढत होती. एका विशिष्ट वासामुळे अपस्माराचा झटका येणं ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे,`` असं डॉ. सेठी यांनी सांगितलं.

  मेंदीत एका विशिष्ट प्रकारच्या मातीचा सुगंध असतो. त्यामुळे मेंदी लावलेला हात छातीजवळ नेताच या मुलीला झटका येत असल्याचं दिसून आलं. ही मुलगी सुरुवातीला बेचैन होती आणि त्यानंतर तिला झटके येऊ लागले. झटक्यामुळे तिचे हात-पाय आखडून जात होते तसेच ती डोळे फिरवत होती. त्यामुळे आम्ही तिच्या शरीरातील सोडियम वॅल्प्रोएटची तपासणी केली. तिला मेंदी लावणं किंवा तिच्याजवळ मेंदी नेणं टाळा, असा सल्ला तिच्या पालकांना दिला. आता या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला पुन्हा अपस्माराचा झटका आलेला नाही,`` असं डॉ. सेठी यांनी सांगितलं.

  First published:

  Tags: Delhi, Private hospitals