Home /News /national /

भारताचे 'जेम्स बॉंड' अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडलेल्या तरुणानं केला धक्कादायक दावा

भारताचे 'जेम्स बॉंड' अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडलेल्या तरुणानं केला धक्कादायक दावा

भारताचे 'जेम्स बाँड' म्हणून ओळख असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या घरात एका अज्ञात व्यक्तीनं घुसखोरी (security breach) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: भारताचे 'जेम्स बाँड' (India's James Bond) म्हणून ओळख असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या घरात एका अज्ञात व्यक्तीनं घुसखोरी (security breach) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्तीने अजित डोवाल यांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न (Unknown man tried to enter in ajit doval's house) केला आहे. मात्र येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी संबंधित व्यक्तीला थांबवून ताब्यात घेतलं आहे. हा धक्कादायक प्रकार घडताच सुरक्षारक्षकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलच्या टीमकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घुसखोरी करणाऱ्या तरुणाला पकडल्यानंतर तो विचित्र पद्धतीने बडबड करताना दिसला आहे. तो आपल्या शरीरात कोणीतरी चिप बसवली असल्याचा दावा करत होता. तसेच आपल्याला रिमोटद्वारे नियंत्रित केलं जात असल्याचा दावा देखील आरोपी तरुणानं केला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी त्याच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली. मात्र पोलिसांना त्याच्याकडे कोणतीही चिप आढळली नाही. हेही वाचा-राऊतांच्या आरोपांना सोमय्यांचे प्रत्युत्तर, पत्रकार परिषदेत केला मोठा गौप्यस्फोट ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बेंगळुरू येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांचे दहशतवादविरोधी युनिट, स्पेशल सेल त्या व्यक्तीची चौकशी करत आहे. या व्यक्तीला ताब्यात घेऊन लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात ही चौकशी सुरू आहे. याबाबत अधिक माहिती येणं बाकी आहे. पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा-VIDEO: अन् मंदिरातच महिलांसोबत किर्तन करायला बसले पंतप्रधान मोदी खरंतर, भारताचे जेम्स बाँड म्हणून ओळखले जाणारे अजित डोवाल हे पाकिस्तान आणि चीनसाठी नेहमी डोकेदुखी ठरले आहेत. डोवाल हे अनेक दहशतवादी संघटनांच्याही टार्गेटवर आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जैशच्या एका दहशतवाद्याकडून डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी करण्यात आली होता. याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. संबंधित दहशतवाद्याने हा व्हिडीओ पाकिस्तानी दहशतवाद्याला पाठवला होता. यानंतर डोवाल यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Delhi

    पुढील बातम्या