जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! आई रागावली म्हणून 17 वर्षीय मुलीनं थेट उचललं हे पाऊल

धक्कादायक! आई रागावली म्हणून 17 वर्षीय मुलीनं थेट उचललं हे पाऊल

धक्कादायक! आई रागावली म्हणून 17 वर्षीय मुलीनं थेट उचललं हे पाऊल

नाकळत्या वयात मुलं-मुली अनेकदा टोकाचं कृत्य करतात. यात त्यांच्या जीवावरही गोष्टी बेततात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुरादाबाद, 10 जानेवारी : उत्तर प्रदेशाच्या मुरादाबाद (Moradabad, Uttar Pradesh) इथून एक भयानक बातमी मिळते आहे. 17 वर्षीय मुलीबाबत ही बातमी आहे. एका 17 वर्षांच्या मुलीला (17 year old girl) आपल्या आईनं (mother) रागावणं इतकं मनाला लागलं, की तिनं घरात ठेवलेल्या बेकायदेशीर पिस्तुलानं (pistol) स्वतःला गोळी मारून घेतली. यानंतर नातेवाईक (relatives) तिला तडकाफडकी जवळच्या रुग्णालयात (hospital) उपचार करण्यासाठी घेऊन गेले. उपचारादरम्यान काहीच तासात तिचा मृत्यू (death) झाला. ही मुलगी ज्युनियर कॉलेजात शिकत होती असं कळतं आहे. हे प्रकरण मुरादाबादच्या मुंढापांडे भागातलं आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, मुलीला आई कुठल्यातरी गोष्टीवरून रागावली होती. यानंतर तिनं स्वतःला पिस्तुलानं गोळी मारून घेतली. उपचारादरम्यान तिचा जीव गेला. पोलिसांनी  घटनास्थळी पोचत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांचं म्हणणं आहे, की शवविच्छेदनानंतर (postmortem) पुढची कारवाई केली जाईल. वडील प्रेमपाल यांनी सांगितलं, की घटना घडली तेव्हा ते घरी नव्हते. त्यांना फोन आला, की आईनं बोलल्यामुळं मुलीनं हे पाऊल उचललं आहे. घरात लायसन्स नसलेलं देशी पिस्तूल (कट्टा) होतं. मला दुपारी 1 वाजता घरच्यांनी फोन करून याबाबत माहिती दिली. हे ही वाचा- Sex रॅकेट आणि ड्रग्जचं ‘स्वीट हार्ट’ उद्ध्वस्त; माफियाविरोधात लागणार NSA घटनेबाबत कळताच पोलिसही हॉस्पिटलला पोचले. घटनास्थळावर पोचलेल्या इन्स्पेक्टर अर्जुन त्यागी यांनी सांगितलं, की ही मुलगी बारावीत शिकत होती. पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मुरादाबाद शहर पोलीस अधीक्षक अमित आनंद यांचं म्हणणं आहे, की एका मुलीचा आपल्या आईशी वाद झाला, त्यातून राग आल्यानं तिनं घरात ठेवलेलं पिस्तूल घेत स्वतःला गोळी मारून घेतली. नातेवाईक मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण काही तासातच तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात